- जाणून घ्या या भरजरी पेहरावाची किंमत
विशेष प्रतिनिधी
मुंबई: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिला एलीगंस आणि ग्लॅमरची राणी म्हटले जाते. ती आपल्या कपड्यांच्या निवडीमुळे नेहमीच चर्चेत राहते.नुकतेच माधुरीने एक सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिने फुल्कारी लेहेंगा परिधान केला आहे. या फुल्कारी लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हा लेहेंगा पाहून तुम्ही देखील या पेहरावाच्या प्रेमात पडाल.WATCH: Dhakdhak Girl’s Ada: Yeh Mera Lehanga-Bada Hai Menhga!
या जांभळ्या रंगाच्या फुल्कारी लेहेंग्याची रचना फॅशन डिझायनर सुकृति आणि आकृति यांनी केली आहे. आपण देखील आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात हा सुंदर पारंपरिक फुल्कारी लेहेंगा परिधान करू शकता.
या लेहेंगाचा ब्लाऊज यू-नेकलाइन आकारात डिझाईन केला गेला आहे आणि संपूर्ण ड्रेसवर सेक्विन मिररचे काम केले आहे. हलका निळ्या रंग असलेल्या या ड्रेसला गोटा पट्टीचे वर्क केले आहे. यासोबत जांभळा आणि पिवळ्या रंगाचा दुप्पटाही जोडण्यात आला आहे.
या लेहेंग्यासह माधुरीने मॅचिंग हूप इयररिंग्ज, पारंपारिक रिंग आणि भारी सिल्व्हर नेकपीसह ब्रेसलेट परिधान केले आहे. जर, आपल्याला देखील हा लेहेंगा परिधान करायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ‘फक्त’ 1, 23, 200 रुपये मोजावे लागतील.