वृत्तसंस्था
नागपूर : नागपूर संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची दहशतवाद्यांनी रेकी करणे ही गंभीर बाब आहे. या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे, असे भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. ते योग्य खबरदारी घेतील. तसेच आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
- नागपूर संघ मुख्यालयाची रेकी गंभीर बाब
- या बाबीला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे
- देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
- दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी
- आशिष शेलार यांना धमकी; कारवाईची मागणी