वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शनिवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पुत्र विवेक डोवल यांची मानहानी केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयात अखेर माफी मागितली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत विवेक डोवल यांनी रमेश आणि कारवां मासिकावर बदनामीकारक लेख दिल्याबद्दल मानहानीचा दावा दाखल केला होता.
Vivek Doval, son of NSA Ajit Doval accepts apology from Congress leader Jairam Ramesh
कारवां मासिकामध्ये डी गँगवर लेख प्रसिद्ध झाल्यानंतर विवेक डोवल यांनी जयराम रमेश तसेच कारवां आणि पत्रकार कौशल श्रॉफ यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. जानेवारी 2019 मध्ये डोवल यांच्या फौजदारी मानहानीच्या तक्रारीची दखल कोर्टाने घेतली होती. मे 2019 मध्ये रमेश यांना जामीन मंजूर झाला होता. आता कारवां आणि श्रॉफ यांच्याविरूद्ध मानहानी कारवाई सुरूच राहणार आहे. Vivek Doval, son of NSA Ajit Doval accepts apology from Congress leader Jairam Ramesh
रमेश म्हणाले की, माझी टिप्पणी एका बातमीवर आधारित होती. शनिवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी सचिन गुप्ता यांनी याबाबत सुनावणी केली. रमेश जयराम यांनी 17 जानेवारी 2019 रोजी पत्रकार परिषदेत विवेक डोवल, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे व्यवसाय उद्योजक जीएनए एशिया फंड यांच्याविरूद्ध काही विधान केली होती.
“मला हे समजले आहे की या विधानांनी आपणास खूप दु: ख झाले. मला हे स्पष्ट करायचे आहे की, ही विधानं किंवा आरोप-प्रत्यारोप, कारवां मासिकात आदल्या दिवशी प्रकाशित झालेल्या एका लेखातून काढलेले निष्कर्ष होते. खटला पुढे जात असताना मला जाणवले की आरोप चुकीचे होते.
Congress leader Jairam Ramesh said, I gave the statement against Vivek Doval and made several allegations in heat of the moment as it was the time of elections. I must verify it.
— ANI (@ANI) December 19, 2020
The case against Caravan magazine to continue https://t.co/XWOTsmq1tX
तथापि, सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आणि लेखात उपस्थित केलेले प्रश्न जनतेत ठळक करणे योग्य वाटले. मी कदाचित तुमच्यावर आणि कुटूंबियांविरूद्ध टीका करण्याचा प्रयत्न केला असेल, असे रमेश यांनी विवेक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. “अशाप्रकारे झालेल्या त्रासाबद्दल मी तुमची आणि कुटूंबाची माफी मागू इच्छितो. “मी आयएनसीला त्यांच्या वेबसाइटवर असलेला पत्रकार परिषदेतील मजकूर हटविण्यास सांगतो,” असेही ते म्हणाले. दरम्यान, विवेक डोवल यांनी जयराम रमेश यांचा माफीनामा स्वीकारला आहे.,
Vivek Doval, son of NSA Ajit Doval accepts apology from Congress leader Jairam Ramesh
ही तर माफी मागण्याची स्पर्धा : अशोक श्रीवास्तव
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मुलाची जयराम रमेश यांनी माफी मागितली. पत्रकार परिषदेत तेव्हा हवे तसे आरोप केले. राफेल प्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयाची माफी मागितली होती. अरविंद केजरीवाल / आम आदमी पक्षाने अनेकदा माफी मागितली. माफी मागण्याची स्पर्धा जणू सुरु आहे, असे ट्विट दूरदर्शनचे वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी केले.