• Download App
    Vaccine boost :महत्वाची बातमी ; सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस ; डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती Vaccine boost: Covaxin for children above 2 years by September,says AIIMS chief Dr.Randip Guleria

    Vaccine boost : महत्वाची बातमी ; सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस ; डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे .कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीमेत भारत आणखी एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकणार आहे. येत्या सप्टेंबरपासून भारतात दोन वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरवात होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधील महत्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनीइंडिया टूडे सोबत बोलताना ही माहिती दिली.Vaccine boost: Covaxin for children above 2 years by September,says AIIMS chief Dr.Randip Guleria

    भारतात चार ठिकाणी लहान मुलांवर कोरोना लसीच्या क्लिनीकल ट्रायलला सुरुवात झालेली आहे. या ट्रायलचा डेटा सप्टेंबर महिन्यांपर्यंत हाती येईल, त्याचदरम्यान २ वर्षांवरील मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याची परवानगी मिळू शकते अशी माहिती गुलेरिया यांनी दिली.

    दिल्लीच्या एम्स रुग्णालयात २ ते १७ वयोगटातील मुलांवर लसीच्या क्लिनीकल ट्रायल्स सुरु आहेत. १२ मे रोजी DGCI ने भारत बायोटेकला लहान मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या क्लिनीकल ट्रायलला परवानगी दिली होती.

    Pfizer-BioNTech च्या लसीला हिरवा कंदील मिळाला तर ही लस देखील लहान मुलांसाठी एक चांगला पर्याय ठरु शकते अशी माहिती गुलेरिया यांनी दिली.

    Vaccine boost: Covaxin for children above 2 years by September,says AIIMS chief Dr.Randip Guleria

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार