नाशिक : असली बारकी चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात, असे पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर म्हणाले, खरे पण या वक्तव्यातून उत्तम जानकर यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची अब्रू काढली की आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची म्हणजे शरद पवारांची राजकीय अब्रू काढली??, हा सवाल मात्र तयार झाला.Uttam jankar wanted to target gopichand padalkar and sadabhau khot, but he targets sharad pawar
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीत जाऊन आज मोठी सभा घेतली त्यामध्ये माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचे देखील जोरदार भाषण झाले.
मारकडवाडी प्रकरणात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या जोडगोळीने लक्ष घातल्यानंतर मारकडवाडी फक्त उत्तम जानकार किंवा पवारांच्या पक्षाची उरली नाही. तिथले आंदोलन एकतर्फी चालणार नाही, हे उघड झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी पडळकर आणि खोतांच्या मारकडवाडी भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीला आले आणि त्यांनी भाषणे केली म्हणून पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला काही फरक पडत नाही. असली बारकी चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात, असे उत्तम जानकर म्हणाले.
पण उत्तम जानकरांनी पडळकर आणि खोत यांना बारकी चिरकी उंदरं असं म्हणून त्यांची अब्रू काढली, असे मानले तरी, त्यांनी ते उंदीर मात्र पवार साहेबांना “नाश्त्याला वाढल्या”मुळे पवार नाश्त्याला नेमके काय खातात??, यावरून जानकर यांनी आपल्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची राजकीय अब्रू काढल्याचे सोशल मीडियात पसरू लागले.
यानिमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1970 च्या दशकात मार्मिक मध्ये काढलेले उंदराचे एक राजकीय व्यंगचित्र नजरेसमोर आले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समोर टेबलवर प्लेटमध्ये एक उंदीर उकडून ठेवलेला दाखवला होता आणि यशवंतराव वसंतदादांना सांगताहेत, शरदने जनता पक्षाचा उंदीर असा काही उकडून ठेवलाय की आता त्याची चव घेऊन बघाच!! हे व्यंगचित्र त्यावेळी फार गाजले होते.
या व्यंगचित्रातून बाळासाहेबांनी शरद पवार, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि जनता पक्ष यांची पुरती खिल्ली उडवली होती. पण आता शरद पवार असली बारकी चिरकी 5 उंदर रोज नाश्त्याला खातात, असे म्हणून उत्तम जानकर यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचीच अब्रू काढलीच, पण कळत नकळत शरद पवारांच्याही राजकीय अब्रूला हात घातला हे यातून उघड्यावर आले.
Uttam jankar wanted to target gopichand padalkar and sadabhau khot, but he targets sharad pawar
महत्वाच्या बातम्या
- Bharat Todo : भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
- मुंबईतील कुर्ला येथे भीषण अपघात, बेस्ट बसने 30 जणांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू
- Eknath Shinde तुफान टोलेबाजी अन् एकनाथ शिंदे यांनी यासाठी मानले नाना पटोले यांचे आभार
- ED विकणार ६००० कोटींची जप्त मालमत्ता