• Download App
    काकांनी पती वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार पाडले, पुतण्याने पत्नी शालिनीताई पाटील यांचा कारखाना बळकावला, दादा घराण्याशी पवारांची दुष्मनी जुनीच Uncle overthrew the government with a dagger in the back of husband Vasantdada, nephew grabbed wife Shalinitai Patil's factory, Pawar's enmity with Dada family is old

    काकांनी पती वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार पाडले, पुतण्याने पत्नी शालिनीताई पाटील यांचा कारखाना बळकावला, दादा घराण्याशी पवारांची दुष्मनी जुनीच

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे एकेकाळी राज्याचे नेतृत्व करत होते. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले होते. शरद पवार यांचेच पुतणे अजित पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचा कारखाना बळकावला आहे. Uncle overthrew the government with a dagger in the back of husband Vasantdada, nephew grabbed wife Shalinitai Patil’s factory, Pawar’s enmity with Dada family is old


    अभिजित विश्वनाथ

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे एकेकाळी राज्याचे नेतृत्व करत होते. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले होते. शरद पवार यांचेच पुतणे अजित पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचा कारखाना बळकावला आहे.

    जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा केवळ तीन कोटी रुपयांचा हप्ता थकला होता. कारखान्याच्या बॅँक खात्यात आठ कोटी रुपये होते. त्यामुळे हे पैसे हप्ता भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शालिनीताई पाटील यांनी केली होती. मात्र, त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँक या शिखर बॅँकेचे प्रमुख अजित पवार होते. त्यांनी ही परवानगी देण्यास नकार दिला. त्यामुळे कारखाना विक्रीला काढण्यात आला. अजित पवार यांच्याच नातेवाईकांनी हा कारखाना विकत घेतला. अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्र कुमार घाडग यांनी हा कारखाना विकत घेतला आहे. त्यामुळे शालिनीताई पाटील यांच्या राजकारणाला मोठा फटका बसला.

    डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भाग-भांडवल उभारत चिमणगावच्या माळावर साखर कारखाना उभा केला होता. मात्र, राज्यातील सत्ताधारी असेल्या पवार घराण्याने त्यांना प्रत्येक वेळी विरोध केला. कारखान्याच्या मंजुरीपासून लिलाव प्रक्रियेपर्यंत त्यांना प्रत्येक वेळी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. अजित पवार यांच्याच ताब्यात असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखाना उभारणीस कर्ज दिले नाही. त्यामुळे शालिनीताई यांनी राज्यातील इतर बँकांकडून कर्ज घेत कारखान्याची उभारणी केली.

     

    मात्र पहिल्याच गळीत हंगामापासून कारखाना विविध कारणांनी अडचणीत येत गेला. कारखान्यातील कामगारांनी संघटना स्थापन केली, रायगड जिल्ह्यातील एका कामगार नेत्याने कारखान्यासाठी आंदोलन उभे केले. आर्थिक आरिष्टात सापडल्यानंतर कारखाना चालवणे अवघड झाल्याने कारखाना भाडेतत्वावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील मोठे साखर उद्योजक झुनझुनवाला यांनी काही काळ कारखाना चालविला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर सहकारातील सर्वात मोठ्या वारणा समुहाने काही काळ कारखाना चालविला, मात्र संचालक मंडळासह कामगारांच्या कुरबुरीमुळे त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यांच्यानंतर सिध्दार्थ समुहाने काही काळ कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील मधूनच व्यवस्थापन सोडून निघून गेले. अखेरीस राज्य सहकारी बँकेने थकीत कजार्पोटी कारखान्याचा लिलाव केला.



    या लिलाव प्रक्रियेमध्ये भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याने सुरुवातीला भाग घेतला, मात्र त्यांनी ऐनवेळीस माघार घेतली. त्यानंतर मुंबईस्थित गुरु कमोडिटीज कंपनीने कारखाना लिलावात विकत घेतला. गुरु कमोडिटीज कंपनीने कारखान्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. त्यांनी राज्यातील विविध सहकारी बँकांकडून कर्जे घेतली. साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. त्यामुळे हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीहून कमी होती त्या कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला कारखाना कसा विकत घेतला? हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. आता याच गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करून जप्तीची कारवाई केली आहे.

    दादा घराण्याला पवारांनी दिलेला हा दुसरा झटका आहे. १९७८ मध्येही शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. विशेष म्हणजे त्यावेळी दोघेही एकाच पक्षात होते. आणीबाणीनंतर देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व झुगारून देत रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. वसंतदादा पाटील आणि शरद पवार हे दोघेही रेड्डी कॉँग्रेसमध्ये होते. 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. यावेळी जनता पक्षाने महाराष्ट्रात 99 जागा मिळविल्या होत्या. इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या. रेड्डी काँग्रेसमध्ये असलेल्या वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी, चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली. ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं, अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे घेतले होते. त्यानुसार महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली.

    7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची, तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. 1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होते. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला. त्यामुळे वसंतदादा पाटील यांना अल्पमतात आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता.

    Uncle overthrew the government with a dagger in the back of husband Vasantdada, nephew grabbed wife Shalinitai Patil’s factory, Pawar’s enmity with Dada family is old

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!