विनायक ढेरे
काका न इतुके म्हातारे
बनले फिरूनी जवान
दिल्ली सोडून सिल्वर ओकचे
होती पंतप्रधान
ममता भेटे उद्धव भेटे
केसीआर ही छान
मोदींनाही आव्हान देती
हे चार पहिलवान
जोर काढती शड्डू ठोकती
देती आरोळ्याही छान
लोकसभेत लोळवू मोदी
जिंकू मोठे मैदान
मेहनत चाले आखाड्यात ही
“वस्तादा” वरताण
परी उताणे पडणारच हे
मोदी महापहिलवान!!
(म्हातारा इतुका न… या आचार्य अत्रे यांच्या विडंबन काव्यावर आधारित साभार)
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)