• Download App
    अंगार - भंगार, दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे खुले केले पुन्हा भांडार!!|Uddhav Thackeray and sharad pawar factions use the same "old language" in maharashtra politics today in 2023

    अंगार – भंगार, दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे पुन्हा खोलले भांडार!!

    नाशिक : सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली भांडणे पाहिली तर वर लिहिलेलेच अंगार – भंगार; दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे खुले केले पुन्हा भांडार!!, हेच शीर्षक सूचेल!! कारण शिवसेनेतल्या दोन्ही गटांमध्ये आणि राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये यापेक्षा वेगळे काहीच सुरू नाही सुरू नाही.Uddhav Thackeray and sharad pawar factions use the same “old language” in maharashtra politics today in 2023

    शिवसेनेत दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर घमसान सुरू आहे आणि त्यातूनच शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांना अंगार – भंगार या जुन्याच शब्दांचा मारा करून घायाळ करत आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त वारशाला आरसा शब्द जोडत उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला. बाळासाहेबांचा खरा हिंदुत्वाचा वारसा आमच्याकडेच आहे, पण जे स्वतःला वारस म्हणून घेतात त्यांनी आरशात बघावे असे टीकास्त्र त्यांनी सोडले.



    एकनाथ शिंदे यांच्या या टीकेला नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख अंगार आणि शिंदे गटाचा उल्लेख भंगार असा केला. संजय राऊत यांच्या या टीकेत आता बिलकुलच कोणते नावीन्य उरलेले नाही. एकेकाळी अंगार आणि भंगार हे दोन्ही शब्द एवढे भारी वाटायचे की त्यामुळे दोन्ही गट अक्षरशः घायाळ होऊन जायचे, पण आता हे दोन्ही शब्द वापरून वापरून एवढे बोथट झालेत की त्याचे परिणामही गुळगुळीत होऊन गेलेत!!

    जे अंगार – भंगारचे झालेय, तेच “दिल्ली पुढे झुकणार नाही”, या शब्दांचे झाले आहे. दिल्ली पुढे झुकणार नाही. महाराष्ट्रचे राजकारण दिल्लीतून चालणार नाही, हे शब्द पहिल्यांदा काँग्रेस विरोधी राजकारणातून वापरले गेले. पण काँग्रेसी राजकारणात तेच शब्द पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण यांनी 1978 मध्ये वापरले. त्यावेळी त्यांनी इंदिरा गांधींपासून राजकीय फारकत घेऊन स्वतःची चव्हाण – रेड्डी काँग्रेस काढली होती. महाराष्ट्रातल्या जनतेने त्या काँग्रेसला “चड्डी काँग्रेस” असे नाव दिले होते. 1978 ते 1980 या दोन वर्षांमध्ये काँग्रेसी राजकारणात “महाराष्ट्राचा स्वाभिमान” हे शब्द शिरले होते. पण 1980 मध्ये इंदिरा गांधींनी पराभवाचा दणका देताच यशवंतराव चव्हाणांना स्वगृही परतावेसे वाटले. महाराष्ट्राचा स्वाभिमान गुंडाळून ते 1981 मध्ये इंदिरा काँग्रेसमध्ये शरणागत झाले.

    काँग्रेसी राजकारणात “महाराष्ट्राच्या स्वाभिमानाने” 1999 मध्ये पुन्हा उचल खाल्ली आणि महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही, अशी गर्जना करत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण निदान दोन वर्षे तरी दिल्ली पुढे न झुकता महाराष्ट्रात राहिले होते, पण पवार तेवढी दोन वर्षेही दिल्ली पुढे न झुकता काढू शकले नाहीत. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ते दिल्ली पुढे झुकले आणि काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले.

    पण आजही शरद पवारांच्या गटाची “महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणार नाही”, ही भाषा कायम आहे. राष्ट्रवादीत बंड करून ती ताब्यात घेऊन 100 दिवस उलटल्यानंतर अजित पवारांनी जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात बहुजन राजकारणासाठी आपण सत्तेवर गेल्याचा दावा केला. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार गटाने पुन्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा उकरून काढला. अजित पवार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सत्तेवर गेल्याचे शरद पवार गटाने म्हटले. अजित पवार दिल्लीच्या सत्तेपुढे झुकले, पण शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र कधीच दिल्ली पुढे झुकणार नाही, हीच गर्जना पुन्हा एकदा केली.

    त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा “अंगार – भंगार” आणि “दिल्ली पुढे नाही” या गुळगुळीत झालेल्या शब्दांची बुळबुळीत चर्चा सुरू झाली!!

    Uddhav Thackeray and sharad pawar factions use the same “old language” in maharashtra politics today in 2023

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!