नाशिक – जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन देशांच्या मुख्य नेत्यांनी काल आणि आज आपापल्या देशवासीयांसमोर भाषणे केली आहेत. या भाषणांमध्ये या दोन्ही देशांच्या धोरणातील मूलभूत फरकांप्रमाणेच दोन्ही नेत्यांच्या व्यक्तिमत्वातले भिन्नत्वही दिसून येते. Two speeches; two nations; two leaderships; xi jingping and narendra modi
- चीनचे सर्वोच्च नेते क्षी जिंगपिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या (सीसीपी) बैठकीत जे भाषण केले, ते आता सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी जे भाषण केले, ते देखील आता सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
- दोन्ही नेत्यांच्या भाषणामधला फरक हा की चीनच्या नेत्याचे भाषण हे पार्टीच्या बैठकीत होते आणि भारतीय नेत्याचे भाषण देशाच्या जनतेला उद्देश्यून होते.
- चिनी नेत्याच्या भाषणातली भाषा नक्कीच गोड गुलाबीची आणि आकर्षक होती. पण त्यामागचा अर्थ अधिक खोलवर आणि जगावर सांस्कृतिकदृष्ट्या राज्य करण्याचा मनसूबा व्यक्त करणारा होता. चीनच्या प्रमुखांना साऱ्या जगाला चीनचे सांस्कृतिक महत्तता पटवून द्यायची आहे.
- तर भारतीय नेत्याचे भाषण नेहमीप्रमाणे सेवाभावाने भरलेले आणि लोककल्याणाच्या घोषणा करणारे सौम्य असे होते. यात केंद्र सरकार म्हणून जबाबदारीची जाणीव होती. पण त्याचवेळी ज्या देशाने कोरोना नामक विषाणूयुध्द साऱ्या जगावर लादले आहे, त्याचा उल्लेखही नव्हता. त्या देशाच्या युध्द लादण्याच्या खुमखुमीची आर्थिक किंमत भारताबरोबर साऱ्या जगाला चुकवावी लागतेय, यावर मोदींनी काहीही भाष्य केले नाही.
- चिनी नेत्याच्या भाषणात कोरोनाच्या उगमाचा उल्लेख नव्हता. तसेच महायुध्दामध्ये जेवढी माणसे मेली, त्यापेक्षा अधिक माणसे गेल्या वर्षभरात कोरोना नावाच्या चीनच्या वुहानच्या लॅबमध्ये जन्माला घातलेल्या विषाणूपबाधेने मेलीत या विषयीची संवेदनशीलताही नव्हती.
- … होते ते फक्त गोड गुलाबी भाषेत चीनच्या संस्कृतीचे गुणगान आणि ती संस्कृती सगळ्या जगावर लादण्याची महत्त्वाकांक्षा. यासाठी वाट्टेल ते हत्यार वापरण्याची चीनची तयारी असल्याचे चीनच्या नेतृत्वाने जाहीरपणे सांगितले. सारे जग काय म्हणते आहे, याविषयी या नेतृत्वाला काही देणे घेणे नाही.
- सारे जग कोरोनाच्या मूळाच्या शोधात असताना चिनी नेतृत्व जगावर सांस्कृतिक वर्चस्वाची भाषा बोलते आहे.
- अर्थात याला भारतीय नेतृत्वाने आज कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. उलट भारताच्या अंतर्गत आणि पराराष्ट्र धोरणाला अनुसरून सौम्य आणि सेवाभावी उपाययोजना राबविण्याची घोषणा करणारे हे भाषण होते.
- यामध्ये संघराज्य व्यवस्थेतील काही दोषांचा सौम्य शब्दांमध्ये उल्लेख होता. पण दोषांना वळसा घालून पुढे जाण्याचा मनसूबा होता. विविध राज्यांनी आणि समाजतल्या बुध्दिमंत घटकाने विशिष्ट मानसिकतेतून केलेल्या टीकेवर भाष्य करण्याचा इरादा होता. पण टीकेचा सडेतोड समाचार घेण्याची तयारी नव्हती.
- एकूण भारताच्या soft state याच प्रतिमेला अनुसरून भारतीय नेतृत्वाचे भाषण होते. या भाषणाची भारतीय जनतेला आता सवय व्हायला लागली आहे. आपले नेतृत्व आता पक्षातीत बनले आहे, हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.
- प्रश्न फक्त हा आहे, की हा प्रयत्न ज्यांच्यासाठी चालला आहे, ते देशातले अंतर्गत विरोधक आणि बाहेरच्या देशातले विरोधक ते स्वीकारणार आहेत की नाहीत…??
- … की शांततेची कबुतरे उडविणाऱ्यांच्याच पंक्तीत या मोराला दाणे खाऊ घालणाऱ्या नेतृत्वाला बसवणार आहेत…??