• Download App
    संकटमोचक ! वाढदिवस गडकरींचा अन् 'गिफ्ट' देशाला ; जेनेटिक लाईफ सायन्स-वर्धा येथे ब्लॅक फंगसवरील औषध निर्मिती Troubleshooter! Gadkari's birthday 'gift' to the country; Genetic Life Science-Wardha's drug production on black fungus

    संकटमोचक ! वाढदिवस गडकरींचा अन् ‘गिफ्ट’ देशाला ; जेनेटिक लाईफ सायन्स-वर्धा येथे ब्लॅक फंगसवरील औषध निर्मिती ; केवळ १२०० मध्ये मिळणार औषध

    • रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव थांबणार, पैसेही वाचणार; नितीन गडकरी पुन्हा मदतीला धावले

    • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनंतर वर्धाच्या जेनेटिक लाईफ सायन्सने अँफोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनला काळ्या बुरशीच्या उपचारासाठी वापरण्यासाठी तयार केले आहे.

    • वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सच्या ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचे सोमवारपासून वितरण 

    • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रयत्नाने केवळ १२०० रुपयांमध्ये हे इंजेक्शन रुग्णांना मिळणार आहे. सध्या त्याची बाजारातील किंमत ही ७००० रुपये आहे.Troubleshooter! Gadkari’s birthday ‘gift’ to the country; Genetic Life Science-Wardha’s drug production on black fungus

    विशेष प्रतिनिधी

    वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे .म्युकर मायकोसिस म्हणजे  ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येमध्ये भर पडत असताना त्याच्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण होतोय. अशा वेळी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सने ब्लॅक फंगसवरील उपयोगी Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन सुरु केलं असून सोमवारपासून त्याचं वितरण करणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर या कंपनीला या उत्पादनाची परवानगी मिळाली होती.Troubleshooter! Gadkari’s birthday ‘gift’ to the country; Genetic Life Science-Wardha’s drug production on black fungus

    सध्याच्या घडीला देशातील केवळ एकच कंपनी Amphotericin B Emulsion इंजेक्शनची निर्मिती करत होती. त्यानंतर आता जेनेटेक लाईफ सायन्सेस ही या इंजेक्शनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी ठरली आहे.

    यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर होईल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. सध्या बाजारात Amphotericin B Emulsion इंजेक्शनची कमतरता आहे.

    एका इंजेक्शनसाठी ७ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.

    गडकरींचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. योगायोगानं आजचं त्यांच्या कार्यालयाकडून जेनेटेक लाईफ सायन्सेसकडून तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनची निर्मितीची माहिती देण्यात आली. या कंपनीला इंजेक्शनचं उत्पादन करता यावं यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला होता.

    ही कंपनी १५ दिवसांत उत्पादन सुरू करेल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाकडून १४ मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर १३ दिवसांत कंपनीनं उत्पादन सुरू केलं आहे.

    Troubleshooter! Gadkari’s birthday ‘gift’ to the country; Genetic Life Science-Wardha’s drug production on black fungus

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी