Monday, 5 May 2025
  • Download App
    कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईतांची झाडाझडती ७१४ गुन्हेगार आढळले, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त   To handle the law and order situation in city ,Pune police implemented combing operation in city and to investigate three thousand criminal

    कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईतांची झाडाझडती ७१४ गुन्हेगार आढळले, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त  

    शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. पोलिसांनी ३० एप्रिलला मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेत ३ हजार १४८ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७१४ गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय अमली पदार्थ तस्करांविरूद्ध कारवाई करून  इतर आरोपींकडून १२ कोयते, तलवारी, चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. To handle the law and order situation in city ,Pune police implemented combing operation in city and to investigate three thousand criminal

    गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यातील विविध पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी १८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १२ कोयते, चार तलवारी, चाकू, पालघन अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. त्याशिवाय गंभीर गुन्ह्यात पसार असणारे आरोपी संतोष लक्ष्मण राठोड (वय १९, रा. शांतीनगर, वानवडी,पुणे), सूर्यकांत उर्फ पंडीत दशरथ कांबळे (वय २६,रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी, दत्तवाडी,पुणे) यांना अटक करण्यात आली. बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी अनिकेत अनंत देसाई (वय ३६), दिग्विजय सनातन नायक (वय २५, दोघे रा. गीतांजली बिल्डींग, ओैंध,पुणे) यांना अटक केली. बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली. ७२ लिटर गावठी दारू, दारु तयार करण्याचे साहित्य, २६० लिटर ताडी, बिअर बाटली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हॉटेल आणि लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान ६०९ संशयितांना थांबवून तपासणी करण्यात आली. त्याशिवाय १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाने  ३९८ वाहनचालकांकडे परवाना, कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये १४ दुचाकी, २२ तीनचाकी, १९ चारचाकी मिळून ५५ वाहनचालकांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ही कामगिरी  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, डॉ. नामदेव चव्हाण, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त रोहिदास पवार, उपायुक्त नम्रता पाटील, वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या पथकांनी केली.

    To handle the law and order situation in city ,Pune police implemented combing operation in city and to investigate three thousand criminal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!