• Download App
    रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी A theft cheated the auto rikshaw driver, crime registered in police station

    रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

    प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे – प्रवासी असल्याचा बहाणा करुन चोरट्यांनी रिक्षा चालकाला प्रसादातून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर चालकाच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविल्याची घटना पुण्यातील पद्ममावती भागात घडली. याबाबत रिक्षाचालक अशोक बाबुराव सोनवणे (वय ६५, रा. गणेश चेंबर, धनकवडी,पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.A theft cheated the auto rikshaw driver, crime registered in police station

    पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी प्रवासी असल्याचा बहाणा करुन रिक्षाचालक सोनवणे यांना रिक्षा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे नेण्यास सांगितले.

    चोरट्यांनी दर्शन घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर चोरट्यांनी रिक्षाचालक सोनवणे यांना प्रसादातून गुंगीचे औषध दिले. रिक्षा पद्ममावती येथे नेण्यास सांगितले. प्रसादातून गुंगीचे औषध दिल्यानंतर रिक्षाचालक सोनवणे यांना गुंगी आली.

    सोनवणे यांनी रिक्षा पद्ममावती परिसरात थांबविली. ते बेशुद्ध पडल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५४ हजारांची सोनसाखळी लांबविली. काही वेळानंतर सोनवणे शुद्धीवर आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस शेंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    A theft cheated the auto rikshaw driver, crime registered in police station

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!