• Download App
    हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही; एम. के. स्टॅलिन यांच्या हजेरीत उपदेशक कलैरासी नटराजन यांचे वादग्रस्त विधान | The Focus India

    हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही; एम. के. स्टॅलिन यांच्या हजेरीत उपदेशक कलैरासी नटराजन यांचे वादग्रस्त विधान

    वृत्तसंस्था

    चेन्नई : हिंदू नावाचा कोणता धर्मच अस्तित्वात नाही, असे वादग्रस्त विधान उपदेशक कलैरासी नटराजन यांनी ख्रिशन धर्मियांच्या कार्यक्रमात केले. यावेळी द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन उपस्थित होते. या वादग्रस्त विधानानंतर भाजपने द्रमुकवर हिंदूविरोधी असल्याची जोरदार टीका केली आहे. There is no religion called Hinduism’: Furore over Tamil preacher’s comments in presence of DMK chief Stalin

    दोन शतकांपूर्वी हिंदू अस्तित्वात आल्याचे सांगताना ते म्हणाले, आपण सर्व विशेषतः तामिळ शैव आहोत. त्यावर स्टॅलिन हे हिंदूविरोधी असल्याची टीका राज्यातील भाजपने टीका केली. ख्रिश्चन वोट बँकसाठी हा खटाटोप केला जात आहे. त्यासाठी उपदेशकांना खरेदी केल जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

    स्टॅलिन हे हिंदूविरोधी असून आम्ही भगवान मुरूगनचे भक्त आहोत. हा भगवान मुरूगन यांचाच अवमान आहे. तो कदापिही खपवून घेतला जाणार नाही, असे भाजपचे राज्य प्रमुख एल. मुरूगन यांनी सांगितले.

    भाजपचे प्रवक्ते नारायण तिरुपती म्हणाले, की द्रमुक हिंदूविरोधी असून टीका करण्यासाठी उपदेशकांना पैसे दिले जात आहेत. त्या माध्यमातून ख्रिश्चन मते मिळविण्याचा खटाटोप आहे.

    There is no religion called Hinduism’: Furore over Tamil preacher’s comments in presence of DMK chief Stalin

    विश्व हिंदू परिषदेचे सदस्य श्रीराज नायर म्हणाले, की स्टॅलिन यांनी समजून घेतले पाहिजे की, ते वारंवार त्याच चुका पुन्हा करत आहेत. ही बाब एखाद्या समुदायाचा अनुनय कारण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ते तामिळनाडूच्या राजकारणातून हद्दपार होतील.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…