• Download App
    The young man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law

    पत्नी आणि सासूचा छळास कंटाळून तरुणाची आत्महत्या, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सांगितले कारण

    पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळलो असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनिल पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. The young man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळलो असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनिल पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

    रश्मी रोहित पवार (वय 26), लता राजेश चव्हाण (वय 46) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आणि रश्मी यांचे 2016 साली लग्न झाले होते. रश्मी हिची सासू-सासर्‍यापासून वेगळे राहण्याची इच्छा होती. त्यासाठी रोहितला आग्रह करत होती.त्याने दुसरीकडे बाहेर नोकरी करण्यासाठी देखील ती रोहितला त्रास देत होती. घरातील कोणाशीही त्याने बोलायचे नाही असा तिचा आग्रह असायचा. यावरून त्यांची अनेकदा भांडणे देखील होत होती.

    त्यामुळे त्याची सासू लता आणि पत्नी रश्मी या दोघींनी त्याला वारंवार शिवीगाळ व मानसिक त्रास दिला. त्याच्याशी सातत्याने भांडणे केली. या छळाला कंटाळलेल्या रोहित ने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यामध्ये ‘मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्याला माझी पत्नी व सासू जबाबदार आहेत’ असे देखील नमूद केले आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग ताब्यात घेतले आहे.

    The young man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…