Wednesday, 7 May 2025
  • Download App
    आकडा कमी मात्र चीनने अधिकृतपणे मान्य केले गलवान चकमकीत त्यांचे सैनिक झाले ठार The numbers are low, but China has officially acknowledged that their soldiers were killed in the skirmishes

    आकडा कमी मात्र चीनने अधिकृतपणे मान्य केले गलवान चकमकीत त्यांचे सैनिक झाले ठार

    भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत आपला एकही सैनिक मारला गेला नाही असे चीनकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता पहिल्यांदा आकडा कमी दिला असला तरी चीनने आपले चार सैनिक मारले गेल्याचे कबुल केले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत आपला एकही सैनिक मारला गेला नाही असे चीनकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता पहिल्यांदा आकडा कमी दिला असला तरी चीनने आपले चार सैनिक मारले गेल्याचे कबुल केले आहे. The numbers are low, but China has officially acknowledged that their soldiers were killed in the skirmishes

    चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमीशनने (सीएमसी) मृत्यूमुखी पडलेल्या सर्व सैनिकांना शौर्य पदक देऊन सन्मानित केले आहे. मात्र, चारच जणांना हा सन्मान देण्यात आला आहे. मात्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी या हिंसाचारात चीनचे 45 सैनिक मारले गेले होते असे म्हटले होते.

    चीनमधील सरकारी टीव्ही सीजीटीएनच्या वृत्तानुसार, सीएमसीने शुक्रवारी मारल्या गेलेल्या या सर्व सैनिकांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन आणि मानद उपाधीने सन्मानित केले. गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांशी लढताना मारला गेलेला चीनचा सैनिक चेन हॉन्गजुनला चीनच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ़ चायनाने (सीसीपी) जारी केलेला शतकातील हिरो हा किताब दिला आहे. याशिवाय चीनने इतर सैनिक, चेन जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन यांना फर्स्ट क्लास मेरिट सायटेशन दिले आहे. चिनी सैनिकांचे नेतृत्व करणारे एक कर्नल, क्यू फेबाओ (रेजिमेंटल कमांडर) या हिंसक झटापटीदरम्यान गंभीर जखमी झाले होते. त्यांना हिरो कर्नलची उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.

    प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यावेळी एकही गोळी झाडली गेली नव्हती. मात्र, चीनने गलवानचे नाव न घेता म्हटले आहे, की जून महिन्यात एका सीमा वादात हे नुकसान झाले आहे.

    भारत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या चकमकीत चीनचे किमान 45 सैनिक मारले गेले होते. मात्र, सीएमसीने मारल्या गेलेल्या एकूण सैनिकांची संख्या सांगितलेली नाही. केवळ ज्या सैनिकांना सन्मानित करण्य आले, त्याच सैनिकांची माहिती देण्यात आली आहे. सीएमसी, ही चीनमधील सर्वात मोठी सैन्य संस्था आहे आणि चीनचे राष्ट्रपती, शी जिनपिंग या संस्थेचे चेअरमन आहेत

    The numbers are low, but China has officially acknowledged that their soldiers were killed in the skirmishes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??