• Download App
    पगडी काढून सहकाऱ्याचे प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान | The honor of the commando who saves the life of a colleague by removing the turban is honored

    पगडी काढून सहकाऱ्याचे प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान

    छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला. The honor of the commando who saves the life of a colleague by removing the turban is honored


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्या ला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला.

    छत्तीसगडमधील बिजापूरजवळील जंगलात नक्षलवाद्यांशी केलेल्या हल्यावेळी जवानांनी शौर्याची पराकाष्टा केली. त्याचबरोबर या संकटाच्या काळात माणुसकीची अनेक उदाहरणेही समोर आली. यातीलच एक अनोखे उदाहरण म्हणजे बलराज सिंग. आपले सहकारी अभिषेक पांडे यांच्यासोबत ते नक्षलवाद्यांशी लढत होते. हल्यात पांडे जखमी झाल्यावर बलराज सिंग यांनी आपली पगडी काढली आणि त्यांच्या जखमा बांधून रक्तस्त्राव थांबविला. यामुळे पांडे यांचे प्राण वाचले.

    रायपूर येथील रुग्णालयात गोळी लागल्याने बलराज सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र कुमार वीज यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना पगडी परिधान करून त्यांचा सन्मान केला.

    वीज यांनी हा फोटो ट्विट करताना म्हटले आहे की संकटकाळातही हा एक आनंदाचा क्षण आहे. पगडी परिधान केल्यावर बलराज सिंह यांना खूप आनंद झाला होता.

    The honor of the commando who saves the life of a colleague by removing the turban is honored


    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!