आता महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. पारडे कुणाचे जड आहे, हे स्पष्ट झाले आहे. राज्याची धुरा आता एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, तर उपमुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. 21 जूनपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले होते. यादरम्यानच शिवसेनेबाबत नवा वाद सुरू झाला. कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शिवसेनेवर आपला दावा सांगत आहेत.The Focus Explainer So whose Shiv Sena is it now? Eknath Shinde’s Uddhav Thackeray? To whom will Balasaheb’s legacy go? Read more
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा करण्याची तयारी सुरू आहे. एवढेच नाही, तर शिंदे गट स्वतःला खरा शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा अनुयायी म्हणवून घेत आहे. एवढेच नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेण्याबाबत दोन्ही गट डंके की चोट पे बोलत आहेत.
आता सत्तानाट्य संपल्यानंतर पुढची राजकीय लढाई निवडणूक आयोगासमोर लढली जाणार आहे. कारण आता शिवसेनेच्या चिन्हावर म्हणजेच धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला जाणार आहे. मात्र, निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा निर्णय हा निवडणूक आयोग घेणार आहे.
एकनाथ शिंदेंनी डीपी बदलून दिला संदेश…
बाळ ठाकरेंचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि शिवसेनेवर आपला हक्क सांगण्यासाठी, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्विटरचा डीपी बदलला. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पायाजवळ बसलेला फोटो लावला आहे. बाळासाहेबांसोबतचा फोटो टाकून शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मोठा संदेश दिला आहे. एवढेच नाही तर शिंदे ज्या ज्या वेळी मीडियासमोर आले आहेत, त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल वारंवार बोलले आहेत.
शिंदे म्हणाले- आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत
एकनाथ शिंदे सुरतहून गुवाहाटीला रवाना होणार होते, तेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यांनी शिवसेना सोडली आहे का, त्यावर त्यांनी सांगितले की, मी शिवसेना सोडलेली नाही, मी बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांची विचारधारा घेऊन पुढे गेलो आहे. आम्ही शिवसेनेत राहू, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, सत्तेसाठीही नाही, हे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं असल्याचं ते म्हणाले होते. आम्ही शिवसेना सोडणार नाही.
बाळासाहेबांचे वचन…
दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी झाला नसून, शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आल्याचा दावा करत आहेत. हा बाळासाहेब ठाकरेंचा नेहमीचे वचन राहिले आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत, असे तेही म्हणत आहेत.
अशा स्थितीत पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्याकडून ‘खऱ्या शिवसेनेला’ बहुमत मिळवावे लागणार आहे. एका पक्षात केवळ मोठ्या संख्येने आमदारांची उपस्थिती एखाद्या गटाला पक्ष म्हणून ओळखण्यासाठी पुरेसे नाही.
काँग्रेसचा किस्सा
काँग्रेस फुटली. त्यानंतर इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस, असे दोन भाग झाले. काँग्रेसच्या चिन्हावरून वाद झाला. तेव्हा एकसंघ काँग्रेसचे बैलजोडी हे राजकीय चिन्ह नंतर गाय वासरू झाले आणि नंतर मग पंजा आला. हा रजंक किस्सा प्रसिद्ध आहे.
तज्ज्ञांच्या मते, मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांना एखाद्या राजकीय पक्षात विलीन होण्याची गरज नाही. कारण आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही असे ते सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला आम्ही पुढे नेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला भाजपच्या सोबत मिळून पुढे न्यायचा आहे. म्हणून शिवसेना बाळासाहेब असा वेगळा गट तयार केला आहे.
आता शिंदे विधिमंडळात वेगळा गट म्हणून बसतील की राजकीय पक्षात विलीनीकरण करतील, हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. बंडखोर गट दुसऱ्या राजकीय पक्षात विलीनीकरण करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांचे वेगळे अस्तित्व राहणार नाही आणि मतदारांना शिवसैनिक आहोत, असे सांगून ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे मतदारांना धोका दिला, असे वाटण्याची शक्यता आहे. म्हणूनच, आता शिवसेना कुणाची या प्रश्नाचा गुंता निवडणूक आयोगाच्याच दरबारात सुटेल.
The Focus Explainer So whose Shiv Sena is it now? Eknath Shinde’s Uddhav Thackeray? To whom will Balasaheb’s legacy go? Read more
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रासाठी भाजपचा दूरवरचा विचार, म्हणून हा मास्टरस्ट्रोकच, वाचा खरी रणनीती
- शिंदे – फडणवीस सरकार : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो आरे कारशेड ते जलयुक्त शिवार सर्व जुना योजनांचे पुनरुज्जीवन!!
- मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस एकटेच नाहीत; मग एवढी चर्चा का??; उपमुख्यमंत्री की कार्यकारी मुख्यमंत्री??
- प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षादेशाचे पालन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट!!