वृत्तसंस्था
पुणे: खानावळीतील आचाऱ्याने घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू व दागिने, दोन दुचाकी, १ टीव्ही व ४६ हजार रुपये असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. The burglar was working as a cook in a restaurant,Arrested by police
आकाश अशोक उमाप (रा. वानवडी) असे त्याचे नाव आहे. आचारी म्हणून काम करताना तो डबे पोचवत होता. तेव्हा तो बंद घरांची रेकी करत होती. त्याची माहितीसाथीदारांना देत असे. त्यानंतर ते घरफोडी करत होते.
पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना हडपसर येथील जबरी चोरीचा गुन्हा एका आचार्याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वानवडीतील विकासनगर भागात सापळा रचून आकाश उमाप याला पकडले. चौकशीत त्याने “मी स्वत: आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे काम करतो. तुम्हाला माझ्याबाबत मिळालेली माहिती चुकीची आहे.” असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.
उमाप हा वानवडी परिसरातील एका मेसमध्ये जेवण बनविण्याचे व डबे पोचविण्याचे काम करत आहे. तेव्हा पुण्यातील विविध परिसरात बंद घरांची रेकी तो करत होता. साथीदारांना त्याची माहिती देत होता. सराईत गुन्हेगार जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्या सोबत त्याने घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला, छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन, म्हणाले- आम्ही अडचणीत, मदत करा!
- या 9 राज्यांनी केंद्राने दिलेल्या लसींचा पूर्ण वापर केला नाही, यामुळेच मंदावली लसीकरणाची गती
- विरोधकांच्या कोलांटउड्यांमुळे पुन्हा केंद्राकडेच लसीकरणाची कमान, पीएम मोदींच्या निर्णयामागील महत्त्वाचे मुद्दे
- Modi Speech : राज्ये अपयशी ठरल्याने केंद्रानेच घेतली पुन्हा जबाबदारी; आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस
- उध्दव ठाकरे, अजित पवार उद्या पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षण, कोरोनावर चर्चा