विशेष प्रतिनिधी
चंढीगड: टेलिफोन टॉवरवर हल्ले चढवू नका, या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या आवाहनाला आंदोलक शेतकऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आतापर्यंत १३३८ पेक्षा टॉवरची नासधूस केल्याचे उघड झाले. त्यामुळे संपर्क यंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. The agitating farmers are out of control
अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्या शेतकर्यांकडून धान्य खरेदी करीत नाहीत. परंतु नवीन कृषी कायद्यांचा फक्त त्यांनाच फायदा होईल, या मुद्दाम पसरलेल्या शंकेने पंजाबमधील वेगवेगळ्या ठिकाणी निषेध करणार्या शेतकऱ्यानी रिलायन्स जिओ टॉवर्सची तोडफोड केली. काल एका दिवसात १५१ टॉवर्सची मोडतोड केली. त्यामुळे संपर्क व्यवस्थेत अडथळे आले.
राज्यात एकूण १३३८ टेलिकॉम टॉवर आहेत. या टॉवरवर कुऱ्हाडीने वार केले. अशा घटना पंजाबच्या विविध भागांत घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते म्हणाले, “साइट व्यवस्थापक आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली जाते.”
दुसरे स्रोत म्हणाले की, खराब झालेले टेलिकॉम टॉवर्स जिओ आणि टेलिकॉम इंडस्ट्रीचे आहेत. या हल्ल्यांमुळे दूरसंचार सेवांवर परिणाम झाला. सेवा चालू ठेवण्यासाठी ऑपरेटर झटत आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांना गैरसोय होऊ नये. तसेच संयम पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केले होते.
The agitating farmers are out of control
कोविडमुळे लोकांमध्ये टेलिकॉम कनेक्टिव्हिटी अधिकच आवश्यक बनली आहे, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले, दिल्ली सीमेवरील आंदोलनावेळी जी शिस्त पाळली होती. तीच आताही अपेक्षित आहे.
दूरसंचार कनेक्टिव्हिटी जबरदस्तीने बंद करुन किंवा दूरसंचार कर्मचारी / तंत्रज्ञ यांच्यावर हल्ले चढवू नका. कायदा हातात घेऊ नका,अशी कृती पंजाब आणि भविष्याच्या हिताची नाही, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले होते.