कोणत्याही यशस्वी लोकांकडे काही तरी वेगळे असे गुण असतात त्यामुळे ते अन्य लोकांपेक्षा सहज यशस्वी ठरतात. यातील एक महत्वाचा गुण म्हणजे जे काह आहे ते खरे सांगायचे. तुम्ही कधीही खोटे नाही बोलले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला परदेशामध्ये एक सुंदर बंगला विकत घ्यायचा आहे सर्व मित्रांसोबत तिथे पार्टी करायची आहे.Tell the truth or don’t lie
परंतु सत्य परिस्थिती ही आहे की तुम्ही आर्थिक दृष्ट्या तेवढे सक्षम नाही. अनेक गोष्टी आहेत जिथे आपल्याला वास्तविकता माहिती असून देखील आपण मनासोबतच खोटे बोलत असतो. त्यामुळे आपल्याला नेहमी आपल्या डोळ्यापुढे फार मोठे उद्दिष्ट ठेवायचे नाही याउलट आपण असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे जी आपण टप्प्याटप्प्याने मिळवत जाऊ. कारण असे करीत असताना आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढत जाईल आणि ह्या गोष्टीचे समाधान देखील असेल की आपण टप्प्याटप्प्याने का होईना पण आपले स्वप्न पूर्ण करीत आहोत. आपल्याला कधी स्वतःच्या मनासोबत खोटे बोलायचे नाही.
त्याचप्रमाणे तुम्ही ज्याच्याशी बोलता आहात त्याचा कडून तुम्हाला शिकायचे आहे. आपण जेव्हा कधी कुणासोबत हि चर्चा करत असून तेव्हा हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे की त्या चर्चेतून आपल्याला काहीतरी नवीन शिकता आलं पाहिजे आणि काहीतरी नवीन ज्ञान घेता आलं पाहिजे. त्याचा खरा अर्थ असा असतो की दोन वेगवेगळ्या लोकांच्या विचारातून एक नवीन कल्पना निर्माण व्हायला पाहिजे. आजच्या काळात लोक आपल्या आयुष्यात किती दुःख आहे हे सांगण्यात वेळ व्यतीत करीत असतात.
ते समोरचा व्यक्ती काय सांगत आहेत याकडे कधीच लक्ष देत नाही. आपल्याला दुसऱ्यांच्या आयडिया ऐकून वाईट वाटू शकते कारण आपल्या काही आयडिया वर आपण लहानपणापासूनच विश्वास ठेवत आलो आहोत आणि असे देखील होऊ शकते की आपल्या आयडिया चुकीच्या सिद्ध होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जर प्रगती करायची असेल तर इतरांच्या मनातील चांगल्या कल्पना जाणून देखील घ्याव्या लागतील.