• Download App
    IIT जम्मूने जानेवारी सत्रासाठी 11 विविध विषयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू | IIT Jammu starts admission process for PhD admission in 11 different subjects for January session

    IIT जम्मूने जानेवारी सत्रासाठी 11 विविध विषयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : IIT जम्मूने जानेवारी सत्रासाठी 11 विविध विषयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी ऍडमिशन प्रोसेस सुरू केली आहे. ह्या कोर्सेस साठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जैव विज्ञान आणि जैव अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, मानवता आणि सामाजिक विज्ञान, साहित्य अभियांत्रिकी, गणित , यांत्रिक अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्र इत्यादी विषयातील पीएचडी आठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. IIT जम्मूच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे.

    IIT Jammu starts admission process for PhD admission in 11 different subjects for January session

    अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील इंजिनिअरिंग पदवी किंवा अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील संशोधनाद्वारे पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार तसेच चांगले शैक्षणिक रेकॉर्ड किंवा विज्ञानातील पदव्युत्तर पदवी असलेल्या आणि योग्य GATE स्कोअर / UGC/CSIR-JRF/GPAT / NBHM पीएचडी साठी अप्लाय करू शकतात.


    IIT जोधपूर प्लेसमेंट 2021-22 : प्रतिवर्ष 24.38 लाख रु. अँव्हरेज पॅकेज


    अर्ज केलेल्या उमेदवारांना 24-25 नोव्हेंबर रोजी निवड प्रक्रियेसाठी कॉल लेटर मिळण्याची शक्यता आहे.

    24 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी IIT जम्मूच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले होते. 210 कोटी रुपये खर्चून हे कॅम्पस बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासह वसतिगृह, व्यायामशाळा, इनडोअर गेम्स यासारख्या सर्व सुविधा आहेत.

    IIT Jammu starts admission process for PhD admission in 11 different subjects for January session

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NIA : भारतात घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पोहोचला, स्लीपर सेल नेटवर्क तयार करण्यासाठी आला होता

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीवर भाजपने म्हटले- राहुल भ्रम पसरवताहेत; काँग्रेस 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण करत आहे, आम्ही तत्काळ कारवाई केली

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!