- नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता
वृत्तसंस्था
कोलकाता : बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बांगलादेशमधील मशिदी आणि मदरशांमध्ये शिक्षकच मुलांवर बलात्कार करतात, असे ट्विट करून नसरीन यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. taslima nasrin statement
तस्लिमांनी यावेळी बांगलादेशमधील मशीद आणि मदरशांचा उल्लेख करत इमाम आणि शिक्षकांवर निशाणा साधला आहे. बांगलादेशमधील मशीदींमध्ये इमाम आणि मदरशांमध्ये शिक्षक मुलांवर बलात्कार करतात असे त्यांनी म्हटले आहे. taslima nasrin statement
तस्लिमा नसरीन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “बांगलादेशमध्ये जवळपास दररोज इमाम आणि मदरसा शिक्षक मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार करतात. अल्लाहच्या नावाने ते बलात्कार करतात. अल्लाह दयाळू आहे हे त्यांना माहिती आहे.
सभी धर्मों में सुधार कि तरह इस्लाम में सुधार नही हुआ; तसलीमा नसरीन की दो टूक बात
यामुळे दिवसातून पाच वेळ नमाज पठण केले तर अल्लाह केलेले पाप माफ करेल”. नसरीन यांनी यावेळी फेसबुक पोस्टची लिंकही ट्विटमध्ये शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
taslima nasrin statement
कोण आहेत तस्लिमा नसरीन?
तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आहेत. ‘लज्जा’, फेरा, बेशरम या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथांवर ताशेरे झाडल्याने त्यांना बांगलादेशातून बहिष्कृत करण्यात आले. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या फतव्यामुळे त्यांना बांगलादेश सोडावा लागला होता. भारताने त्यांना आश्रय दिला आहे.