Monday, 5 May 2025
  • Download App
    ममता बॅनर्जी - शरद पवार भेट नव्हे फक्त चर्चा; "लोकशाही वाचवा" घोषणा देत ममता दर दोन महिन्यांनी येणार दिल्ली दौऱ्यावर talked to Sharad Pawar.Visit was successful. We met for political purpose. Democracy must go on. Our slogan is 'save democracy save country

    ममता बॅनर्जी – शरद पवार भेट नव्हे फक्त चर्चा; “लोकशाही वाचवा” घोषणा देत ममता दर दोन महिन्यांनी येणार दिल्ली दौऱ्यावर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीच्या राजकीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा राजकीय स्वरूपाची होती आणि ती यशस्वी झाली, अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या चर्चेनंतर पत्रकारांना दिली. talked to Sharad Pawar.Visit was successful. We met for political purpose. Democracy must go on. Our slogan is ‘save democracy save country

    ममतांच्या ५ दिवसांच्या दिल्ली दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी शरद पवारांशी चर्चा केल्याची माहिती दिली. पण दोन्ही नेत्यांची भेट झालेली नाही.
    आपल्या दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींपासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते कमलनाथ, आनंद शर्मा, अरविंद केजरीवाल, द्रमूकच्या कनिमोळी आदी महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. त्या काल जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांना देखील भेटल्या. शरद पवारांशी ममतांनी राजकीय स्वरूपाची चर्चा केली. त्यांची शरद पवारांची भेट झाली नाही.

    दिल्ली दौऱ्याच्या अखेरीस तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना दिल्ली दौऱ्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की “लोकशाही वाचवा” ही सर्व विरोधकांची जाहीर घोषणा आहे. त्यादृष्टीने विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर इथून पुढच्या काळात दर दोन महिन्यांनी आपण दिल्ली दौरा करणार असल्याचे आणि सर्व विरोधी पक्षांची सातत्याने संपर्कात राहण्याचे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.



    ममता बॅनर्जी या तृणमूळ काँग्रेस या प्रादेशिक पक्षाच्या नेत्या असल्या तरी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा वाढीस लागली आहे. आपल्या पहिल्याच दिल्ली दौऱ्यात त्यांनी सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या राष्ट्रीय नेतृत्वावर त्यांची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा राजकीय प्रयत्न गंभीर स्वरूपाचा मानण्यात येतो.

    सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी आणि अन्य विरोधी नेत्यांमध्ये समन्वयाचे काम करतात. या दृष्टीने ममता बॅनर्जी यांचा पहिलाच दिल्ली दौरा एक प्रकारे यशस्वी झाल्याचे राजकीय वर्तुळात मानण्यात येत आहे.

    लोकशाही संस्थांवर मोदी संस्कार हल्ले करत आहे. ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय संस्थांचा राजकीय विरोधकांच्या विरोधात गैरवापर करण्यात येत आहे, असे आरोप त्यांनी केले आहेत. सर्व विरोधी पक्षांची प्रबळ भाजप विरोधात आघाडीची मोट बांधण्याची ममतांनी तयारी चालवली आहे. गेल्या पाच दिवसांचा हा दिल्ली दौरा या प्रयत्नातला पहिला भाग मानला जात आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ममता बॅनर्जी या ऑक्टोबर महिन्यात दिल्ली दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

    talked to Sharad Pawar.Visit was successful. We met for political purpose. Democracy must go on. Our slogan is ‘save democracy save country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Icon News Hub