भारताच्या कालच्या पराभवानंतर माजी मंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बीसीसीआयवर जोरदार निशाणा साधलाय.Subramaniam Swamy targets BCCI after India-Pakistan match; Said – Budhu 2021 book should be given
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाक यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून (india) पराभूत होण्याची मालिका खंडीत केली.
खरंतर कालच्या सामन्यात विराटने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी खेळी केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला १५० धावांचा पल्ला गाठता आला. पण पराभवानंतर चहूबाजूंनी विराटवर टीका सुरु आहे. त्याच्या काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.क्रिकेट हा एक खेळ असल्यामुळे यामध्ये यशापयश या गोष्टी ओघाने आल्याच.
हा सामना भारताने गमावला असला तरी सध्या टीम इंडियाचा मोठेपणा कालच्या सामन्यात पाहायला मिळालं. पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. विराटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतात क्रिकेट एक धर्म आहे. फक्त सर्वसामान्य लोकच क्रिकेटचे चाहते नाहीत, तर बॉलिवूड, तसेच राजकारणातली लोकही या खेळाशी जोडली गेली आहेत.
भारताच्या कालच्या पराभवानंतर माजी मंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक बीसीसीआयवर जोरदार निशाणा साधलाय.त्यांनी एक टि्वट केलं आहे.’बीसीसीआयमधील निर्णयकर्त्यांना बुद्धू २०२१ चा किताब दिला पाहिजे’ असं टि्वट स्वामींनी केलं आहे. तसेच दहशतवादाची विक्री करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळण्यीची इतकी घाई का? असा सवाल काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामींनी विचारला होता.
Subramaniam Swamy targets BCCI after India-Pakistan match; Said – Budhu 2021 book should be given
महत्त्वाच्या बातम्या
- तिरुपती मंदिरात दर्शनासाठी ३०० रुपयांचा विशेष प्रवेश पास ; ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवाही सुरू
- नवज्योत सिंग सिध्दूंच्या नेतृत्वाखालची काँग्रेस म्हणजे क़ॉमेडी शो; हरससिमरत कौर बादल यांचे टीकास्त्र
- कोयना परिसरात झालेला भूकंप ३.९ रिश्टर स्केलचा; केंद्रबिंदू धरणापासून २८ किलोमीटरवर
- उत्तर प्रदेशात आणखी दोन माफियांची १६५ हेक्टर जमीन जप्त; शमशाद आणि शरीफ पहिलवान यांच्यावर कायद्याचा बडगा