पुण्यात शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड यांना उत्सवाच्या ठिकाणी कडक बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.Strict police security at major temples in Pune on the occasion of Navratri festival
विशेष प्रतनिधी
पुणे : आजपासून नवरात्रौत्सव सुरू झाले आहेत. यादरम्यान लोकडाऊन पासून बंद असलेली मंदिरे नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहेत .परंतु वाढता कोरोना लक्षात घेऊन उत्सवाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुण्यात शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड यांना उत्सवाच्या ठिकाणी कडक बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.मंदिराजवळ गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके म्हणाल्या की ,”सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत”
नवरात्रौत्सवनिमित्त शहरातील तांबडी जोगेश्वरी, चतुःश्रुंगी माता मंदिर, भवानीमाता मंदिर, सारसबाग येथील लक्ष्मी माता मंदिर, तळजाई माता मंदिर, संतोषी माता मंदिरासह प्रमुख मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
Strict police security at major temples in Pune on the occasion of Navratri festival
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना योद्धा : अभिनेत्री ते परिचारिका बनलेल्या शिखा मल्होत्राला कोरोनानंतर आला अर्धांगवायूचा झटका; पण, नाही डगमगली
- लैंगिक शोषणाबद्दल अखेर पोप यांनी मागितली पीडितांची माफी
- The Focus India Navratri 2021 : अहं सर्वेश्वरी अहं शक्ती!पहिली माळ वर्दीतल्या ‘तेजस्वी’ दुर्गैला !सोलापूरची शान-पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते
- तालिबानचे अत्याचार सुरुच, अल्पसंख्य हजारा समुदायातील १३ जणांची हत्या