• Download App
    १२ नेत्यांच्या पत्राचे सहस्य आणि सोनिया गांधींचे यूपीए नेतृत्व sonia gandhi UPA leadership and political challange from mamata banerjee

    १२ नेत्यांच्या पत्राचे रहस्य आणि सोनिया गांधींचे यूपीए नेतृत्व

    sonia gandhi UPA leadership and political challange from mamata banerjee

    सोनिया गांधींना शरद पवारांचे दिल्लीतील आव्हान कधीच “गंभीर” वाटलेले नाही. उलट ममतांच्या यशामुळे त्या अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते आहे. शिवाय ममतांचे हे आव्हान दुहेरी आहे. ते नुसते सोनियांपुरते मर्यादित नाही तर राहुल गांधींच्या उरलेल्या राजकीय कारकिर्दीसाठी अधिक गंभीर आव्हान ठरू शकते. sonia gandhi UPA leadership and political challange from mamata banerjee


    विनायक ढेरे

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या बऱ्याच “पोलिटिकली ऍक्टीव्ह” झाल्या आहेत. बंगालच्या निवडणूकीत “ममता उदय” झाल्यापासून त्या अस्वस्थ असल्याचे बोलले जाते आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे नेतृत्व ममतांकडे जाण्याचा धोका त्यांना वाटतो आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये बरीच राजकीय सक्रीयता दाखवायला सुरूवात केली आहे.

    निदान पंतप्रधान नरेंद्र मोदींना नऊ कलमी पत्र लिहिण्याचे आणि त्या पत्रावर १२ नेत्यांच्या सह्या घेण्याचे “राजकीय टायमिंग” सोनियांची राजकीय सक्रीयताच सूचित करते आहे. हे पत्र लिहिण्यापूर्वी सोनियांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेऊन काँग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलून पक्षातल्या अस्वस्थतेची हवा काढून घेतली. कोविड प्रतिबंधक टास्क फोर्स स्थापन करून त्याचे नेतृत्व गुलाम नबी आझादांना दिले. पवनकुमार बन्सलांना त्यात काम दिले आणि जी – २३ नेत्यांमध्ये पुरेशी फूट पाडून घेतली. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आणि कोविड प्रतिबंधक टास्क फोर्स या दोन्हींमधून सोनियांनी पक्षातले अस्वस्थ आवाज शांत करून टाकले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेले पत्र हे आता त्याच्या पुढचे पाऊल आहे. सोनिया गांधींना आपली यूपीएवरच्या नेतृत्त्वाची पकड जी मध्यंतरी सैल झाली होती, ती त्यांना पुन्हा घट्ट करायची आहे. त्यासाठी हा पत्राचा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते आहे. पत्रावर त्यांच्याखेरीज ज्या १२ नेत्यांच्या सह्या आहेत, त्यापैकी ममता बॅनर्जी यांची सही सर्वांत महत्त्वाची आहे. कारण सोनियांनंतर यूपीएमध्ये त्यांचेच नेतृत्व ठळकपणे उठून दिसते आहे.



    अर्थात आजही ममतांची तृणमूळ काँग्रेस ही यूपीएची घटक पक्ष नाही. तरीही मध्यंतरी ममतांकडे यूपीएचे अध्यक्षपद किंवा निमंत्रकपद येण्याची राजकीय चर्चा रंगली होती आणि सामनातून शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदाची एकहाती चर्चा घ़डवून आणण्यापेक्षा नक्कीच गंभीर स्वरूपाची होती. कारण त्याला ममता बॅनर्जींच्या अभूतपूर्व यशाचे अधिष्ठान होते. जे शरद पवारांना आपल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच लाभलेले नाही. त्यामुळे सोनिया गांधींना शरद पवारांचे दिल्लीतील आव्हान कधीच “गंभीर” वाटलेले नाही. उलट ममतांच्या यशामुळे त्या अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते आहे. शिवाय ममतांचे हे आव्हान दुहेरी आहे. ते नुसते सोनियांपुरते मर्यादित नाही तर राहुल गांधींच्या उरलेल्या राजकीय कारकिर्दीसाठी अधिक गंभीर आव्हान ठरू शकते.

    म्हणून सोनिया गांधी सध्या राजकीय सक्रीयता दाखवून आपल्या नेतृत्वाच्या छायेखालीच ममतांसह सर्व विरोधी नेत्यांना पुन्हा एकदा आणू इच्छित असल्याची दिल्लीच्या वर्तुळात चर्चा आहे. सोनियांच्या छायेखालचे “अनेकांपैकी एक” नेतृत्व शरद पवारांचे आहे. म्हणून काल रात्री जेव्हा पत्राची बातमी आली तिच्यात पवारांचे नाव शेवटच्या पॅरेग्राफमध्ये होते. ते also ran सारखे छापण्यात आले होते.

    कोविड काळाचा राजकीय लाभ…

    या खेरीज काँग्रेस पक्षाच्या फेरबांधणीसाठी कोविड काळ ही सर्वोत्तम संधी असल्याचे सोनियांना वाटते, अशी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात चर्चा आहे. तिच्यात तथ्य नक्की आहे. राहुल गांधी काही पक्ष फेरबांधणीसाठी थेट पुढाकार घेत नाहीत. त्यांचा निवडणूक परफॉर्मन्स देखील निराशाजनक आहे. तो आलेख आणखी घसरण्यापूर्वी त्यांना सावरले पाहिजे या हेतूने देखील सोनिया गांधी पुन्हा सक्रीय झाल्याची पक्षातच चर्चा आहे.

    राहुल पक्षाध्यक्षपदाच्या निवडणूकीत उभे राहावेत, असे जी – २३ नेत्यांना वाटते. म्हणजे त्यांना पर्यायी नेतृत्व निवडणूकीतून उभे करता येईल आणि जमले तर निवडून आणता येईल, असाही जी – २३ नेत्यांचा मनसूबा असल्याचे बोलले जात आहे. इंडिया टुडेने त्यावर भाष्य केले आहे. याचा अर्थ “गांधी” हा शब्द काँग्रेसमध्ये “एकमेव” राहणार नाही, अशी व्यवस्था जी – २३ नेते करू इच्छितात, असा काढला गेला आहे. त्यामुळे देखील सोनिया गांधी पुन्हा पक्षात सक्रीय झाल्याची चर्चा आहे. कारण जी – २३ नेत्यांचा राहुल गांधींच्या नेतृत्वावर आक्षेप असू शकतो. ते सोनियांच्या विरोधात आवाज काढण्याची सुतराम शक्यता नाही.

    वर उल्लेख केलेली ही सगळी राजकीय राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर सोनिया गांधींनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र आणि त्यावर १२ नेत्यांचा घेतलेल्या सह्या यांचे राजकीय रहस्य उलगडू शकते, असे वाटते.

    sonia gandhi UPA leadership and political challange from mamata banerjee

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…