• Download App
    लवकरच 2 ते 18 वर्षे वयोगटालाही मिळणार लस, DGCIची भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी मंजुरी । DCGI gives nod to Bharat Biotech to conduct Covaxin trial on Kids age group between 2 and 18

    लवकरच २ ते १८ वर्षे वयोगटालाही मिळणार लस, DGCIची भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी मंजुरी

    Covaxin trial on Kids : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झगडणाऱ्या भारतात तिसर्‍या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे. असे म्हटले जात आहे की कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होईल आणि लहान मुलांसाठी देशात एकही लस उपलब्ध नाही, यामुळे चिंता वाढली आहे. परंतु आता लहान मुलांसाठी लवकर लस उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील भारत बायोटेकच्या चाचणीस मान्यता दिली आहे. DCGI gives nod to Bharat Biotech to conduct Covaxin trial on Kids age group between 2 and 18


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झगडणाऱ्या भारतात तिसर्‍या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्याची तयारी सुरू झाली आहे. असे म्हटले जात आहे की कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होईल आणि लहान मुलांसाठी देशात एकही लस उपलब्ध नाही, यामुळे चिंता वाढली आहे. परंतु आता लहान मुलांसाठी लवकर लस उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने गुरुवारी 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील भारत बायोटेकच्या चाचणीस मान्यता दिली आहे.

    खरं तर, तज्ज्ञ समितीने मंगळवारी 2 ते 18 वयोगटातील भारत बायोटेकच्या कोरोनाविरोधी लस कोव्हॅक्सिनच्या दुसर्‍या / तिसर्‍या टप्प्यासाठी क्लिनिकल चाचण्या करण्याची शिफारस केली होती. ही चाचणी दिल्ली व पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. भारत बायोटेक ही चाचणी 525 निरोगी स्वयंसेवकांसह करणार आहे.

    सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या कोरोना विषय तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकने 2 ते ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये कोव्हॅक्सिन लसीची सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासह इतर बाबींचे आकलन करण्यासाठी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला परवानगी देण्याची विनंती केली होती.

    कंपनीच्या अर्जावर सविस्तर चर्चा केल्यानंतर समितीने प्रस्तावित दुसर्‍या / तिसर्‍या टप्प्यातील चाचणी घेण्याची शिफारस केली. आतापर्यंत देशात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयासाठीच लस उपलब्ध आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम संस्थेच्या कोविशील्डकडून देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. तथाापि, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या आधीपासूनच ही लस मुलांसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    DCGI gives nod to Bharat Biotech to conduct Covaxin trial on Kids age group between 2 and 18

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’