• Download App
    नाती जवळ आणणारा सोशल मिडीया|Social media that brings relationships closer

    लाईफ स्किल्स : नाती जवळ आणणारा सोशल मिडीया

    सोशल मिडीयाचा सध्या वृद्ध लोकांना नाती जपण्यासाठी मोठा फायदा होतो. साधारणपणे ५१ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्तींना नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे लागते. मात्र, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन, त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा उपयोग या वयोगटातील व्यक्ती करीत आहेत. मुलांना, नातवंडांना त्यांनी गुरू केले आहे. त्याच्यांकडून तंत्रज्ञान समजून घेत आहेत.Social media that brings relationships closer

    परदेशात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेल्या मुलामुलींबरोबर व्हॉट्सअप चॅट, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात राहता येऊ शकते आहे. ऑनलाइन शॉपिंगचा आनंदही घरबसल्या घेता येऊ शकतो आहे. सोशल मीडियावर अध्यात्मिक, तात्त्विक अशी सर्व प्रकारची माहिती मिळते आहे. आताची पिढी सोशल मीडियाच्या अधीन झाली. मात्र त्याचा वापर त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने करता येतो आहे. या वयोगटातील व्यक्तींनी सोशल मीडियाबाबत तक्रारीचा सूर काढला असला, तरी मिळालेल्या सुविधांबाबत ते समाधानी आहेत. नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची धडपड त्यांच्यामध्ये आहे. त्यासाठी मुलांकडून, नातवंडाकडून सोशल मीडिया कसा वापरायचा हे शिकण्याची तयारी आहे.

    एका सपोर्ट ग्रुपमधील सभासदाने व्हॉटसअप ग्रुपमुळे अडचणीच्या काळात लगेच मदत करता येणे शक्य झाल्याचे सांगितले. सोशल मीडियामुळे नात्यात आणि भाषेत मोकळेपणा आला. नातेसंबंधातील दुरावा कमी करण्यासही मदत होते. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणे शक्य झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक अॅप्स उपलब्ध झाले. नाइट ड्युटी करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने सोशल मीडिया फायदेशीर ठरतो आहे. सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांनी सोशल मीडियामुळे अनेक चांगले उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात येऊ लागल्यामुळे आनंदी वातावरण अनुभवयाला येत असल्याचे नमूद केले.

    सध्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना सोशल मीडियाचे महत्त्व पटले आहे. मुलांनी सोशल मीडियाचा फार वापर करू नये याबाबत पालक अधिक सतर्क असतात. कोणतीही माहिती सोशल मीडिया सहज उपलब्ध असल्यामुळे मुले वाईट मार्गाला जाऊ नयेत. सोशल मीडियाचे व्यसन वाढू नये असे पालकांना वाटते. ते खऱेही आहे. मात्र सोशल मिडीयामुळे दूरचे नातेवाईक जवळ येण्यास मदत होत आहे. त्यांच्यातील संवाद वाढला आहे. ते एकमेकांना शुभेच्छा देत आहेत, संकटकाळी मदत करीत आहेत. शेवटी जगण्यासाठी याच तर पूरक बाबींची सध्या फार गरज आहे.

    Social media that brings relationships closer

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!