• Download App
    ऑफर ऑफर खेळू आपण, तिघांत फुगडी घालू; पायात पाय अडकवून, आपण तिघे एकदम पडू!!|So called offer game of and for sharad pawar will cost MVA heavily in maharashtra politics

    ऑफर ऑफर खेळू आपण, तिघांत फुगडी घालू; पायात पाय अडकवून, आपण तिघे एकदम पडू!!

    नाशिक : ऑफर ऑफर खेळू, आपण तिघांत फुगडी घालू; पायात पाय अडकवून, आपण तिघे एकदम पडू!!, अशी अवस्था सध्या महाविकास आघाडीतल्या शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांची झाली आहे.So called offer game of and for sharad pawar will cost MVA heavily in maharashtra politics

    शरद पवार आणि अजित पवार यांची अतुल चोरडिया यांच्याकडे “गुप्त” असलेली आणि नसलेली भेट झाल्यानंतर या तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांच्या विषयीचा संशय एवढा वाढला आहे, की आता ते एकमेकांना रोज टोचून बोलत घायाळ करत आहेत. शरद पवारांना भाजपच्या नेतृत्वाने ऑफर दिल्याच्या वेगवेगळ्या बातम्या काँग्रेसचे नेते उघडपणे बोलून दाखवत आहेत.

    काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर ठळक शंका उपस्थित करत आहेत, तर त्याला राष्ट्रवादीचे नेते उत्तर देताना तो “संभ्रम” असल्याचे सांगत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांच्या बातम्या माध्यमांनी दिल्या, तरी राष्ट्रवादीचे नेते मात्र काँग्रेस नेत्यांपेक्षा माध्यमांवरच या कथित संभ्रमाचे खापर फोडत आहेत. पण हा सगळा खेळ वर उल्लेख केल्याप्रमाणे “ऑफर ऑफर खेळू”, आपण असाच आहे!!



    काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या ऑफर खेळाची सुरुवात केली. शरद पवारांना भाजपच्या नेतृत्वाने अजित पवारांकरवी केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची, सुप्रिया सुळे यांना केंद्रात ऍडजेस्ट करून घेण्याची, तसेच जयंत पाटलांना राज्यात जलसंपदा मंत्रीपद देण्याची ऑफर देण्याची दिल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यानंतर उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सामना अग्रलेख लिहून काका – पुतण्याच्या भेटीवर सडकून टीका केली. त्यांनी देखील शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावून घेतले.

    आज मात्र संजय राऊत त्यापासून मागे फिरले आणि अजित पवार यांच्यासारखे ज्युनिअर नेते सीनियर पवारांना ऑफर देण्याइतपत कधी मोठे झाले??, असा असा सवाल केला.

    वडेट्टीवारांचा कथित गौप्यस्फोट

    पण संजय राऊतांनी हा सवाल करण्याआधी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणे एक गौप्यस्पोट केला, तो म्हणजे शरद पवारांना कोणती ऑफर आहे, यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांपुढे शरद पवारांना भाजपच्या गोटात घेऊन येण्याची अट घातली आणि तरच मुख्यमंत्री पद मिळू शकेल, असे स्पष्ट बजावले, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

    अर्थातच तो दावा अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला. भाजपने कोणतीही ऑफर दिलेली नाही. कोणत्याही अटीतटी लादलेल्या नाहीत. आम्ही फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कणखर नेतृत्व लाभावे म्हणून भाजपबरोबर गेलो आहोत, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

    पण आता नेमका हाच खेळ रोज सुरू आहे, की काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या दिशेने “ऑफर मिसाईल” सोडायचे. त्याचे उत्तर शरद पवारांनी आणि अजित पवारांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये द्यायचे. पण त्या भाषेत तशी ऑफर वगैरे काही नसल्याचे समान सूत्र ठेवायचे. काँग्रेस नेत्यांनी परत एकदा तसेच आरोप करायचे आणि पवारांपासून आपले अंतर वाढवत न्यायचे. असा हा राजकीय खेळ महाराष्ट्रात सुरू झाला आहे.

     आघाडी तोट्यात, भाजप फायद्यात

    पण या खेळाचा मथितार्थ असाच की, “ऑफर ऑफर खेळू आपण, तिघांत फुगडी घालू; पायात पाय अडकवून आपण तिघे एकदम पडू!! कारण असल्या ऑफरच्या खेळातून ना कुठले राजकीय सत्य बाहेर येणार आहे, ना कुणी कुठली ऑफर खरी करून दाखवणार आहे. त्यामुळे ऑफरच्या खेळातून महाविकास आघाडीचा तोटा आणि भाजपचा राजकीय फायदा एवढेच घडणार आहे त्या पलीकडे काही नाही!!

    So called offer game of and for sharad pawar will cost MVA heavily in maharashtra politics

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!