क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये व्यस्त असतानाही त्यांचा देशातील सर्वसामान्यांशी असलेला संपर्क तुटलेला नाही. याचाच अनुभव यूपीएससीत यशस्वी झालेल्या तरुणाला आला. Shubham Kumar, UPSC topper couldn’t believe when he received call from PM Narendra Modi direct from US.
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला. यात ७६१ विद्यार्थी यशस्वी झाले. बिहारचा शुभम कुमार देशात परीक्षेत पहिला आला. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. जागृती अवस्थी दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे. निकाल लागला तेव्हा शुभम कुमार पुण्यात आहे. तो डिफेन्समध्ये प्रोबेशनरी अधिकारी असून प्रशिक्षण घेत आहेत. त्याला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट अमेरिकेतून फोन करुन पुण्यातील शुभमचे अभिनंदन केले.
यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या ७६१ जणांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनी २१६ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असले तरी त्यांनी या सर्वांचे ट्विटरवरुन अभिनंदन केलं. जे अपयशी ठरले त्यांनाही मोदी यांनी धीर दिला आहे. पण युपीएससी टॉपर शुभम कुमारशी थेट अमेरिकेतून फोन करुन त्यांनी साधलेला संवाद सर्वात खास ठरला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट अमेरिकेतून शुभमला फोन केला. शुभमचे अभिनंदन करत, तुम्ही युपीएससी परीक्षा पास करुन देशातील विशेषत: गाव-खेड्यातील तरुणांना प्रेरणा दिली. तुमचा देशाला अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. शुभमला मोदींचा फोन आल्यानंतर त्याच्या मित्रांनीही शुभमचं आणखी कौतुक केले.
तिसऱ्या प्रयत्नात देशात पहिला
देशात पहिला आल्याने खुष असलेला शुभम मूळ बिहारच्या कटिहार येथील आहे.
यापूर्वी त्याने दोनदा यूपीएससी परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात तो देशातच अव्वल ठरला. याआधी त्यानं २०१८ आणि २०१९ मध्ये परीक्षा दिली होती. २०१९ मध्ये तो देशात २९० वा आला होता. २४ वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये शिकतो आहे. शुभमचे वडील ग्रामीण बँकेत व्यवस्थापक असून आई गृहिणी आहे. आई, वडील. बहिण, काका, काकू असा त्याचा परिवार आहे.
Shubham Kumar, UPSC topper couldn’t believe when he received call from PM Narendra Modi direct from US.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या कार्यक्रमादरम्यान निषेध नोंदवण्याचे टिकैत यांचे अमेरिकेतील भारतीयांना आवाहन
- दहशतवादाचा बळी ठरल्याचा पाकिस्तानचा दावा, पण प्रत्यक्षात तोच आगलाव्या देश; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने ठणकावले
- महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे
- ब्रिटनच्या संसदेत काश्मीारबाबतच्या ठरावावरील चर्चेला भारताचा तीव्र आक्षेप
- हात कलम करण्यापासून फासावर लटकवण्याची शिक्षा, तालिबानी राजवटीचे नवे फर्मान