• Download App
    महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे |CBI enqiry in Mahant case

    महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.CBI enqiry in Mahant case

    केंद्र सरकारने त्यासाठी मंजुरी दिल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारतर्फे तशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तशी सूचना केली होती.



    बाघम्बरी मठात सोमवारी नरेंद्रगिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी दुसऱ्या दिवशी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले होते. मात्र विरोधी पक्षांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

    गेले तीन दिवस साऱ्या राज्यात या प्रकरणावरून उलट सुलट चर्चा सुरु होती. अखेर राज्य सरकारने महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

    CBI enqiry in Mahant case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमरनाथ यात्रेकरूंनी तोडले रेकॉर्ड; १२ दिवसांमध्ये किती लोकांनी केली यात्रा??; वाचा सविस्तर!!

    2020 Delhi Riots : 2020 दिल्ली दंगल-माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषी; आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण; 6 आरोपी निर्दोष

    Nagaland IED Blast : नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद; इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते