विशेष प्रतिनिधी
पुणे : आशिकी २’ चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या स्वभावातील नम्रता आणि साधेपणाचं नेहमीच कौतुक केलं जातं. अलीकडेच अभिनेत्री मुंबईतील एका नामांकित कार्यक्रमात सहभागी झाली होती. कार्यक्रम संपल्यावर तिने पापाराझींशी नेहमीप्रमाणे मराठीत संवाद साधला. यानंतर असं काही घडलं ज्यामुळे सध्या इंटरनेटवर सर्वत्र श्रद्धाचं कौतुक करण्यात येत आहे. Shraddha Kapoor news
श्रद्धा कपूर सर्वांना अभिवादन करून घरी जात असताना अचानक तिच्यासमोर एका पापाराझीच्या कॅमेऱ्याची लेन्स पडली. महागडी लेन्स तुटल्याचं पाहून अभिनेत्रीला फारचं वाईट वाटलं. तिने स्वत: खाली पडलेली लेन्स उचलून पापाराझीला सुपूर्द केली. पुढे अभिनेत्रीने त्या पापाराझीची विचारपूस करत “एवढी महागडी लेन्स तुटली ना? मला सांगा कंपनीचं नाव मी घेऊन देते तुम्हाला” असं सांगितलं.
श्रद्धाने केलेली विचारपूस ऐकून उपस्थित सगळेच भारावून गेले. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “श्रद्धा मनाने खूपच चांगली आहे”, “याला म्हणतात माणुसकी” अशा असंख्य कमेंट्स करून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. श्रद्धाचा हा व्हिडीओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर श्रद्धा लवकरच ‘स्त्री’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी अशी तगडी स्टारकास्ट होती. या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
Shraddha Kapoor news
महत्वाच्या बातम्या