स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ नये, यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळही देण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना न्यायालयाचाच अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधातील कारवाई आणि हे प्रकरण का हाताळलं जाऊ नये, यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांचा वेळही देण्यात आला आहे. Show cause notice to Kunal Kamara for contempt of court
कारवाईदरम्यान, कुणाल आणि रचिता या दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असंही सांगण्यात आलं आहे. गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय शुक्रवारसाठी राखून ठेवला होता. न्यायमूर्ती अशोक आर सुभाष रेड्डी, न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने निर्णय सुनावला.
Show cause notice to Kunal Kamara for contempt of court
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादकपद अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि मुख्य न्यायाधीश एसए. बोबडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. कामरानं ट्विट केलं की, त्याच दिवशी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या वाजपेयी या विद्यार्थ्याने अटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांना कुणाल कामराविरोधात अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कारवाई करण्यात येण्यासंबंधीची मागणी केली होती. कामरानेही या प्रकरणी प्रतिक्रिया देत माफी मागण्यास मात्र नकार दिला.