शिवसेनेला खिंडार पाडताना एकनाथ शिंदे यांची बंडखोरी घडविण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली?? कोणी लिहिली??, वगैरे बातम्या आणि विश्लेषणे प्रसार माध्यमांमध्ये खूप आली आहेत. पण प्रत्यक्षात ही बंडखोरी घडवणारी नाट्यातली मुख्य पात्रे रंगमंचावर अद्याप आलेलीच नाहीत!! या मुख्य पात्रांपैकी कोणीही एक शब्दही बोललेला नाही.Shivsena splits : the main script writer of eknath shinde rebellion drama remains silent
जे कोणी पत्रकार परिषद घेऊन बोलले ती या नाटकातली खरंच मुख्य पात्रे होती का?? हाच प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
राऊत – पवार बोलले
शिवसेनेतल्या आमदारांच्या बंडखोरांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली हेच यातले खरे इंगित आहे. संजय राऊत दर तासाला येऊन बोलत आहेत सामनाच्या अग्रलेखातून नेहमीप्रमाणे भाजपवर तोफांच्या फैरी झाडल्या आहेत. शरद पवार काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन गेले ते आज सकाळपर्यंत दुसरे काही बोललेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला वाऱ्यावर सोडून दिल्यास जमा आहे.
भाजप नेत्यांची दुसरी फळी मैदानात
भाजपने आपल्या नेत्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना एकनाथ शिंदे बंडखोरी नाट्याच्या रंगमंचावर जरूर आणले. पण यातले मुख्य पात्र विधान परिषद निवडणुकीचे सेलिब्रेशन करून जे गायब झाले आहे, ते कालचे संपूर्ण 24 तास आणि आज पहाटेपासूनचे 6.00 तास दिसलेच नाही, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस!! एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस अद्याप एक चकार शब्दही बोललेले नाहीत. त्यांनी नाशिक दौरा रद्द करून दिल्ली गाठल्याच्या बातम्या आल्या. पण ते नेमके कुठे आहेत??, हे खऱ्या अर्थाने कोणालाच माहिती नाही. त्यानंतर भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाल्याची बातमी आली. अमित शहा नड्डांकडे गेल्याची बातमी आली. द्रौपदी मुर्मू यांना भाजपने राष्ट्रपतीपदाची उमेदवार जाहीर केल्याची बातमी आली… पण देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहेत?? आणि ते काय बोलतात?? याबाबत कोणत्याही प्रसार माध्यमांना काहीही कळलेले नाही!!
मोदींचे तर कायमच मौन
कोणत्याही राज्यातल्या सत्ताबदल नाट्यातले सर्वात मुख्य पात्र कधीच बोलत नाही. त्यांचे नाव नरेंद्र मोदी!! त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे बंडखोरी नाट्याबद्दल ते काही बोलतील याची सुतराम शक्यता नाही. अमित शहा या नाट्याबद्दल बोललेले नाहीत. जे. पी. नड्डा बोललेले नाहीत. म्हणजे हे कोणीच जाहीर रित्या रंगमंचावर आलेले नाहीत आणि प्रत्यक्षात मोदी, शहा, नड्डा आणि फडणवीस हीच महाराष्ट्रातल्या सत्ताबदल नाट्याची मुख्य पात्रे आहेत!!
पवार मुख्य पात्र उरले नाहीत
आता जर ही चारच मुख्य पात्रे आहेत तर मग काल पत्रकार परिषदेत बोलली किंवा उघडपणे हालचाली करताना दिसली ही मुख्य पात्रे उरतात का?? हा खरा प्रश्न आहे. याचा अर्थ संजय राऊत आणि शरद पवार या नाटकातली मुख्य पात्रे नाहीत असाच होतो!! एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन प्रत्यक्षात चिमणभाई पटेल यांचे राजकीय वारस ठरताहेत आणि या सत्ताबदल नाट्यात शरद पवार मुख्य पात्र उरलेले नाहीत ही यातली खरी राजकीय स्टोरी आहे आणि ती मराठी प्रसारमाध्यमे द्यायला तयार नाहीत!!
मराठी माध्यमांचे पवार स्तुतीचे हवेत उंच पतंग
बाकी एकनाथ शिंदे यांचे पक्षांतर नाट्य शरद पवारांनी घडवले. स्वतः उद्धव ठाकरे हेच त्या मागे आहेत वगैरे मोठे पतंग अनेक विश्लेषकांनी हवेत उडवले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विरुद्ध प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व अशीही वादाची पिल्ले मध्ये मध्ये त्यांनी सोडली आहेत पण कोणीही महाराष्ट्रातल्या सत्ताबदल नाट्यातली पात्रे जाहीररीत्या काहीही बोलले नाहीत हे सांगितलेले नाही!! कारण ते बोलत नाहीत कृती करून दाखवतात याचीच भीती पवार प्रभावित मराठी प्रसार माध्यमांना आहे!!
Shivsena splits : the main script writer of eknath shinde rebellion drama remains silent
महत्वाच्या बातम्या
- 1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!
- भाजप संसदीय मंडळाची आज बैठक : पक्ष राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडण्याची शक्यता, निवडणुकीसाठी 14 सदस्यांची टीम तयार
- ठाकरे – पवार सरकार धोक्यात : एकनाथ शिंदेंचे 13 आमदारांसह बंड!!; सुरतच्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम!!