बुलंद वारसा
दुबळे हात
घड्याळाची साथ घेताच
होई विश्वासघात
साथीदार सोडून जातात
उरत नाही कोणी
मातोश्री वर बसायची
एकटेच येते पाळी
आधीच अंध धृतराष्ट्र
त्यात पुत्रप्रेम
“दुर्योधन” नी “दु:शासन”
करतात पुरता गेम
तेव्हा संजय सांगे युद्ध वार्ता
कौरव झाले गारद
इथे तर संजयच बनला
कळलाव्या नारद
(व्यंगचित्रे : सुमंत बिवलकर)