• Download App
    शिवसेना शरद पवार चरणी लीन, प्रवीण दरेकर यांची टीका | The Focus India

    शिवसेना शरद पवार चरणी लीन, प्रवीण दरेकर यांची टीका

    शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. Shiv Sena Sharad Pawar Pravin Darekar latest news

    दरेकर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांना पुळका नाही. फक्त स्वाथार्साठी हे सर्व सुरु आहे. असाच कायदा करावा म्हणून याच पक्षांनी पत्र काढली होती, कायद्याला समर्थन दिलं होतं आणि आज विरोध करत आहेत. या नेत्यांच्या कथनी आणि करणीतील फरक शेतकऱ्यांना निश्चित कळतो.

    युवराजांचे नाव एका प्रकरणात आल्यावर जणू महाराष्ट्राचा अपमान झाला, प्रवीण दरेकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका

    शिवसेना इतिहास विसरत चालली आहे. बाळासाहेबांनी काय केलं हे देखील ते विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत, हे कुणालाही दाखवण्याची गरज नाही. विरोधकांचा आजचा बंद हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

    Shiv Sena Sharad Pawar Pravin Darekar latest news

    शरद पवार यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, शरद पवार यांचे बदललेले स्वरुप देशासमोर आले आहे. स्वत: केंद्रीय कृषीमंत्री असताना त्यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हा कायदा किती महत्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र पंतप्रधान मोदींनी कायदा केला तर त्याला विरोध करतात, हा केवळ राजकीय विरोध आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…