• Download App
    सरकारकडून किमान हमी भावाने ८६ हजार कोटींच्या तांदळाची खरेदी, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या वाटा ४४ टक्यांवर | The Focus India

    सरकारकडून किमान हमी भावाने ८६ हजार कोटींच्या तांदळाची खरेदी, पंजाबमधील शेतकऱ्यांच्या वाटा ४४ टक्यांवर

    नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार कोटी रुपयांच्या तांदळाची खरेदी केली असून त्यातील ४४ टक्के खरेदी ही पंजाबमधून करण्यात आली आहे.  share of farmers in Punjab is 44 per cent

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नव्या कृषि कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार कोटी रुपयांच्या तांदळाची खरेदी केली असून त्यातील ४४ टक्के खरेदी ही पंजाबमधून करण्यात आली आहे. share of farmers in Punjab is 44 per cent

    दिल्लीमध्ये किमान हमी भावावरून शेतकरी आंदोलन करत आहेत. याच वेळी सरकारने किमान हमी भाव देऊन तब्बल ४५६.७९ लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. त्याची किंमत ८६ हजार २४२.८३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही खरेदी २५ टक्के अधिक असून स्खरीप हंगामातील संपूर्ण तांदळाची खरेदी करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

    विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असतानाही या राज्यांतही खरेदीची प्रक्रिया सुरळितपणे सुरू आहे. फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इतर सरकारी संस्थांनी २७ डिसेंबरपर्यंत ४५६.७९ लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. गेल्या वर्षी ३६६.१९ लाख टन खरेदी झाली होती. केंद्र सरकारने केलेल्या या खरेदीचा लाभ ५६.५५ लाख शेतकऱ्यांना झाला आहे.

    विशेष म्हणजे एकूण खरेदीपैकी एकट्या पंजाबमधूनच ४४.३९ टक्के म्हणजे २०२.७७ लाख टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे.

    share of farmers in Punjab is 44 per cent

    नव्या कृषि कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ३५ दिवसांपासून हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसून आहेत. नव्या कृषि कायद्यांमुळे किमान हमी भाव मिळणार नाही अशी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे. पंतप्रधानांपासून ते केंद्रीय कृषि मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणारच आहे, असे आश्वासन दिले आहे. या वर्षी किमान हमी भावाने विक्रमी खरेदी करून आपले आश्वासन प्रत्यक्षातही उतरविले आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…