नाशिक : महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीच उरली नाही. याचे प्रत्यंतर काल महाविकास आघाडीच्या बैठकीत आले. कारण महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी दांडी मारली, तरीसुद्धा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी संजय राऊत आज उतावळे झाले. Sharad Pawar
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली त्याच्या आधी काल महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या सरकारने प्रथेप्रमाणे चहापान आयोजित केले. पण विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला.
पण त्या आधी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी या आयोजित केली या बैठकीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी अघोषित बहिष्कार घातला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीकडे फिरकले सुद्धा नाहीत. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांनी कम्युनिकेशन गॅप राहिल्याची कबुली देऊन टाकली.
– सगळे काही शरद पवारांच्या खासदारकीसाठी…
या सगळ्याचा अर्थ असा, की राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तुटली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्या आघाडीतून केवळ पवारांच्या राज्यसभा खासदारकीसाठी बाहेर पडली. पण संजय राऊत यांनी ते सत्य कबूल केले नाही. उलट महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. कालच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नसले, तरी त्याचा कुठला वेगळा अर्थ काढू नये. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी आमची इच्छा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
जी महाविकास आघाडी केवळ शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीच्या आग्रहासाठी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोडून खाल्ली, त्या महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे देण्यासाठी संजय राऊत उतावळे झाले.
– दांडी का मारली??
विधानसभेत शिवसेनेचे 20 आमदार असल्याने तसेही विरोधी पक्षनेते पद मिळाले तर ते शिवसेनेलाच मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांमुळे त्यात फारसा फरक पडणार नाही. पण शरद पवारांना अपेक्षित असलेल्या राज्यसभा खासदारकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे दोन्ही पक्ष अनुकूल नाहीत. कारण शरद पवार महाविकास आघाडीच्या 46 आमदारांच्या बळावर राज्यसभेची खासदारकी मिळवणार आणि नंतर भाजपलाच डोळा मारत बसणार हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना मान्य नाही म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीला आतून विरोध चालवलाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी करून भाजपची सुद्धा मते मिळवून खासदार होण्याच्या तयारीला लागलेत म्हणून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची पूर्वतयारी करूनच कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारली.
Sharad Pawar’s NCP’s Dandi at Mahavikas Aghadi meeting
महत्वाच्या बातम्या
- West Bengal : पश्चिम बंगालमध्ये SIR, प्रत्येक जागेवर सरासरी 19000 नावे हटवली; TMCने म्हटले- सव्वा कोटी बंगाली रांगेत उभे
- शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीची 60 वर्षे; सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोशल मीडिया पोस्ट, पण “विलीनीकरण” हा शब्दच नाही त्यात…!!
- Asha Sharma : भारतीय वंशाच्या आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO बनल्या; फिल स्पेन्सर यांची जागा घेतील
- ED : ED ने 9 महिन्यांत ₹32000 कोटींची मालमत्ता जप्त केली; हे गृह मंत्रालयाच्या एका वर्षाच्या बजेटएवढे