• Download App
    कृषी सुधारणेच्या पत्रावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने पवार संतापले; दिल्लीत पत्रकार परिषद संपवून निघून गेले | The Focus India

    कृषी सुधारणेच्या पत्रावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने पवार संतापले; दिल्लीत पत्रकार परिषद संपवून निघून गेले

    • २०१० मध्ये कृषी सुधारणेसंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर केले खुलासेमी लिहिलेले पत्र त्यांनी नीट वाचावे

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावर दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार पत्रकारांवर संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले. त्याच वेळी त्यांनी २०१० मध्ये मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कृषी सुधारणेसंबंधी लिहिलेल्या पत्रावर खुलासे देखील केले. sharad pawar stages anger over journalists

    युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल झाले असून भाजपाने पाठिंबा देण्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले. मात्र पत्रकारांनी वारंवार संबंधित पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने ते संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले. sharad pawar stages anger over journalists

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर पवारांनी यावर भाष्य केले. शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात मी पत्र लिहिले होतं यामध्ये कोणतेही दुमत नाही. पण आज जी तीन नवी कृषी विधेयके आणली आहेत त्यांचा पत्रांमध्ये उल्लेख दिसत नाही”.

    शरद पवार यांचा दुतोंडीपणा, कृषि मंत्री असताना कृषि कायद्यात बदलासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिली होती पत्रे

    शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केले जात असल्याचाही आरोप केला. त्याला जास्त महत्व देऊ नका असेही ते म्हणाले. पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळले. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

    sharad pawar stages anger over journalists

    ते म्हणाले, तुम्ही लोक बाहेर उभे होतात. ते पाहून मला बरे वाटले नाही म्हणून मी तुम्हाला इथे बोलावले. पणउत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. मी तुम्हाला इथे बोलावून चुक केली आहे. यापुढे तुम्हाला बोलावणार नाही”, असे म्हणून ते पत्रकारांना प्रश्नांची उत्तरे न देता निघून गेले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…