प्रतिनिधी
पुणे – दिल्लीत ६ जनपथमध्ये घेतलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे गांभीर्य ज्येष्ठ नेते पुण्यात आपल्याच वक्तव्यातून घालवून टाकले. राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चाच झाली नाही. त्यामुळे मी तिचे नेतृत्व करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण असले उद्योग मी फार वर्षे केलेत, असे वक्तव्य पवारांनी एका कार्यक्रमात केले आणि दिल्लीतल्या उद्योगावर एक प्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला. sharad pawar says, no discussion on third front or leadership in 6, janpath, new delhi
शरद पवार म्हणाले, की राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे तिच्या नेतृत्वावरही चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. पण आम्हाला सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन पुढे जावे लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या यामध्ये पडायचे नाही. राष्ट्रमंचाला मार्गदर्शन करणे, त्यांना शक्ती देणे, मदत करणे, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी मंगळवारी ८ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. पण ते बैठकीला आले नव्हते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पण ही राजकीय बैठक नव्हती, असे राष्ट्रमंचाचे प्रवक्ते माजीद मेमन यांनी सांगितले होते.
आज पुण्यात पवारांनी असले उद्योग मी बरेच वर्षे केलेत असे सांगून ६ जनपथ मधील राष्ट्रमंचाच्या बैठकीचे गांभीर्य घालवून टाकले.
sharad pawar says, no discussion on third front or leadership in 6, janpath, new delhi
महत्त्वाच्या बातम्या
- Delhi Oxygen Audit : केजरीवाल, लाज असेल तर माफी मागा; देशभर तुटवडा असताना दिल्लीत ऑक्सिजनच्या चौपट मागणीवर गौतम गंभीर आक्रमक
- Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला
- ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
- 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी