संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ सिल्वर ओकपाशी दगड फेक आणि चप्पल फेक आंदोलन केले. संतप्त महिलांनी शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. इतकेच नाही, तर सुप्रिया सुळे या शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आई आणि बहीण बनल्या नाहीत, असा आरोप महिलांनी केला.Sharad Pawar: Movements to evict ST workers from Azad Maidan; Pawar remembers breaking the telco strike
मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड राजकारण सुरू झाले असून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु त्याच वेळी संपकरी आणि आंदोलन कर्ते एसटी कर्मचारी यांच्यावर पोलिसी कायद्याचा बडगा चालवून त्यांना आझाद मैदानातून बाहेर करण्याच्या जोरदार हालचाली महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने सुरू केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर प्रचंड फौजफाटा जमवून संचालन केले आहे. त्याचवेळी पोलिस अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना आझाद मैदान सोडून जाण्यासाठी त्यांना सांगत आहेत.
- दगड – चप्पल फेक : सिल्वर ओकपाशी आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हाकलण्याच्या हालचाली!!
परंतु, वकील गुणरत्न सरवदे यांनी सांगितले तरच आम्ही आझाद मैदान सोडू अन्यथा इथेच थांबू, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पोलिसी बळावर मोडून काढलेल्या एका आंदोलनाची आठवण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तुलना अनेकांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपाशी केली आहे. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी ताणून धरले म्हणून शेवटी गिरण्या बंद पडल्या आणि कामगार देशोधडीला लागला तसे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ नये असे इशारे अनेकांनी दिले आहेत. परंतु त्यावेळी गिरणी कामगारांचा संप हा शरद पवारांनी ज्या पद्धतीने टेल्कोचा संप मोडला होता त्या पद्धतीने मोडून काढण्यात आला नव्हता. आज मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या हालचाली पाहता 1990 च्या दशकात मुख्यमंत्री शरद पवारांनी पुण्यात शनिवारवाड्यासमोर जन्मलेल्या टेल्को (म्हणजे आजची टाटा मोटर्स) कामगारांचा संप मोडून काढला त्याची आठवण झाली.
टेल्कोचे म्हणजे सध्याच्या टाटा मोटर्सचे हजारो कर्मचारी राजन नायर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यासमोर आंदोलन करत होते.त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. टीव्ही चॅनेल्स देखील फार नव्हते. होती ती फक्त वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रांच्या डेडलाईन्स त्यावेळी रात्री 2.00 वाजता संपायच्या. म्हणजे रात्री 2.00 वाजल्यानंतरची बातमी वर्तमानपत्रात यायची नाही. हे लक्षात घेऊन पवारांनी “चोख बंदोबस्त” करून टेल्कोच्या कामगारांचा संप सकाळी पहाटे 4.00 ते 6.00 या दोन तासात मोडून काढला होता.
पोलिसी बळावर हजारो टेल्को कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या बस मध्ये भरून महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या शहरांमध्ये उतरवून देण्यात आले होते. शनिवारवाड्याचे मैदान पूर्णपणे अवघ्या 2 तासात पोलिसांनी मोकळे केले होते. त्यावेळी हजारो पोलीस आणि एसआरपी हे अतिशय गुप्तपणे हालचाली करून शनिवारवाड्यावर पहाटेच्या सुमारास पोहोचले होते.
टेल्को कामगारांना आपला संप अवघ्या तासाभरात मोडला जाईल याची कल्पनाही नव्हती. परंतु वर्तमानपत्रांच्या डेडलाईन संपल्यानंतर पहाटे 4.00 ते 6.00 या वेळेत पवारांच्या निर्देशानुसार पोलिसांनी टेल्कोचा संप मोडून काढला होता.
एसटी कामगारांच्या संपाची हालत याच पद्धतीने करण्याचा एकूण महाविकास आघाडी सरकारचा मनसूबा दिसतो आहे. आझाद मैदानात पोलिसांचा मोठा फौजफाटा जमला आहे. पोलीसांनी तेथे संचलन केले आहे आणि काही अधिकारी समजावणीच्या स्वरात कामगारांना आझाद मैदान सोडायला सांगत आहेत. हेच पोलिसी बळावर टेल्को कामगारांचा संप मोडण्यातले आणि आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप मोडून काढण्यातल्या मनसूब्यांमधले साम्य दिसते आहे…!!
Sharad Pawar: Movements to evict ST workers from Azad Maidan; Pawar remembers breaking the telco strike
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांचे निधन
- सिल्वर ओक वर चप्पल फेक : सुप्रिया सुळे शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बहीण नाही बनल्या; महिलांचा आक्रोश!!
- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक
- Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध असंतोष, आंदोलन नवे नाही; कांदा फेक, थप्पड आणि चप्पल फेक!!