• Download App
    पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा Sharad Pawar is meeting Rashtra Manch leaders today.I won't say this is a meeting of all opposition parties. SP, BSP, YSRCP, TDP and TRS also not in this meeting: Sanjay Raut, Shiv Sena

    पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा

    वृत्तसंस्था

    मुंबई – राष्ट्रमंचाच्या नावाखाली ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बोलावलेली बैठक ही काही सर्व विरोधी पक्षांची बैठक नाही. तिच्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष बोलावलेले नाहीत, असा  खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या वक्तव्यातून संजय राऊतांनी काल मोठा हाईप केलेल्या बैठकीची हवा आज काढून टाकली.Sharad Pawar is meeting Rashtra Manch leaders today.I won’t say this is a meeting of all opposition parties. SP, BSP, YSRCP, TDP and TRS also not in this meeting: Sanjay Raut, Shiv Sena

    शरद पवारांच्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही, या बाबत विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, की शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना अनेक नेते, कार्यकर्ते सल्ला मसलतीसाठी आणि राजकीय विषयांच्या, आर्थिक विषयांच्या चर्चेसाठी भेटत असतात. तशीच ही बैठक असली पाहिजे. ही काही सर्व पक्षीय बैठक आहे, असे मला वाटत नाही.

    -हा तर शोलेचा रिमेक – भातखळकर

    भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात ‘अन्ग्रेजो के जमाने के जेलर’च्या भूमिकेत संजयच हवा असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांना लगावला आहे.

    Sharad Pawar is meeting Rashtra Manch leaders today.I won’t say this is a meeting of all opposition parties. SP, BSP, YSRCP, TDP and TRS also not in this meeting: Sanjay Raut, Shiv Sena

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…