• Download App
    पवारांची सुसाट "पुरोगामी" गाडी; "मूळचे पवार - बाहेरचे पवार" वादाच्या स्पीड ब्रेकर वरूनच उलटली!!|Sharad pawar called his daughter in law Sunetra pawar as an "outsider pawar"!!

    पवारांची सुसाट “पुरोगामी” गाडी; सुनेला “बाहेरून आलेली पवार” म्हणून वादात आदळली!!

    नाशिक : पवारांची सुसाट पुरोगामी गाडी “मूळचे पवार – बाहेरचे पवार” वादाच्या स्पीड ब्रेकर वरूनच उलटली!!, असे म्हणायची वेळ शरद पवारांच्याच एका वक्तव्यातून आली आहे.Sharad pawar called his daughter in law Sunetra pawar as an “outsider pawar”!!

    शरद पवारांना एकच मुलगी आहे. त्यांनी आपल्या मुलीला मुलासारखे वाढवून तिला कर्तृत्ववान बनवले आहे, अशी टिमकी वाजविणारी त्यांची जब्बार पटेल यांनी घेतलेली मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून व्हायरल केली. त्यातून पवारांच्या पुरोगामी धोरणाचा डंका पिटला होता. पवार किती पुरोगामी आहेत, मुलगी – मुलगा असा भेद ते कसे करत नाहीत, अग्नी द्यायला मुलगाच पाहिजे, अशा अंधश्रद्धा ते बाळगत नाहीत वगैरे बाता पवारांच्या समर्थकांनी त्या मुलाखतीच्या आधारे मारल्या, पण पवारांच्या एकाच वक्तव्याने या सगळ्या बातांवर अक्षरशः पाणी फेरले… कारण पवार स्वतःच्याच चुलत सुनेला “बाहेरून आलेल्या पवार” असे म्हटले!!



    *अजितदादांच्या लग्नाला 40 वर्षे झाली, तरी शरद पवार आपल्या चुलत सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना “घरातल्या पवार” मानायला तयार नसल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाले. अंजली दमानिया यांच्यासारख्या कट्टर मोदी विरोधकांनी देखील पवारांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पवारांच्या सगळ्या पुरोगामी धोरणाचे पितळ उघडे पडले. शरद पवार फक्त आपल्या मुली पुरते पुरोगामी आहेत, बाकी त्यांचे विचार जुनाट आणि प्रतिगामीच आहेत, अशा तिखट प्रतिक्रिया सोशल मीडिया वरून आल्या.
    याला कारण एकच घडले, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीत शरद पवार सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेल्या पवार” असे म्हणाले.*

    अजित पवार बारामतीतल्या मेळाव्यात आत्तापर्यंत तुम्ही मला निवडून दिले म्हणजे मुलाला निवडून दिले, वडिलांना निवडून दिले म्हणजे पवार साहेबांना निवडून दिले, मुलीला निवडून दिले म्हणजे सुप्रिया सुळे यांना निवडून दिले, आता सुनेत्रा पवारांच्या रूपाने सुनेला निवडून द्या, असे म्हणाले. पण सुनेत्रा पवारांच्या रूपाने पवार घराण्यातल्या सुनेला निवडून द्या, असे म्हटल्याबरोबर शरद पवार चिडले आणि सुनेत्रा पवार या “बाहेरून आलेल्या पवार” आहेत, असे पत्रकार परिषदेत म्हणून बसले. नेमका तोच मुद्दा आता पवारांच्या पुरोगामी धोरणाच्या “गले की हड्डी” बनला आहे. पवारांचा पुरोगामी धोरणाचे पुरते वाभाडे निघाले आहेत.

    अजित पवारांच्या लग्नाला 40 वर्षे उलटून गेले, तरी पवार आपल्या सुनेला “घरातली पवार” किंवा “खरी पवार” मानायला तयार नाहीत. त्यांनी परवाच एकाच मुलीवर आपण कसे थांबलो, असे मुलाखतीत सांगितले. त्यावेळी त्यांचे पुरोगामी धोरण दिसले, पण घरातल्या सुनांना ते “खऱ्या पवार” मानायला तयार नाहीत, यातून ते किती प्रतिगामी आहेत हेच सिद्ध झाले, अशी टीका करणारा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी व्हायरल केला. या सगळ्यात पवारांच्या पुरोगामी धोरणाची अक्षरशः बिन पाण्याने झाली.

     वैऱ्यांचे उंबरठा झिजवण्याची वेळ

    एकीकडे पवार आपल्या मुलीच्या निवडणुकीसाठी बारामतीत एवढे कासावीस झाले आहेत, की ते आपले जुने राजकीय वैर वैर विसरून थोपटे + काकडे + तावरेंचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बारामती तालुक्यातल्या ज्या दुष्काळी गावांकडे पवारांनी गेली 50 वर्षे पूर्ण दुर्लक्ष केले होते, त्या दुष्काळी गावांना भेटी देणे पवारांना भाग पडले आहे. सुपे – कारखेल सारख्या गावांमधला दुष्काळ आता निवारला पाहिजे, असे त्या गावांमध्ये जाऊन पवारांना बोलावे लागत आहे. बारामतीची निवडणूक शरद पवारांना फारच “जड” चालल्याची ते निदर्शक आहे.

    पवार समर्थक वृत्तवाहिन्यांची गोची

    पण एकीकडे पायाला भिंगरी लावून पवारांना त्या दुष्काळी भागात फिरावे लागत असताना दुसरीकडे त्यांच्याच “बाहेरून आलेल्या पवार” या वक्तव्यामुळे त्यांच्या पुरोगामीत्वाचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे. अगदी पवारांच्या समर्थक वृत्तवाहिन्या देखील पवारांनी मूळात हा “घरचा आणि बाहेरचा” वाद काढायची गरज होती का??, असा सवाल विचारणारे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. त्या वाहिन्यांची पवारांचे समर्थन करताना पूर्ण पंचाईत झाली आहे. या मराठी वृत्तवाहिन्या एरवी पवारांचे “चाणक्य” म्हणून ढोल बडवत असतात, पण आता पवारांच्या वक्तव्याचे समर्थन करताना किंवा त्याची त्यावर मखलाशी करताना या वाहिन्यांची आणि त्या त्यांच्या अँकर्सची पूर्ती गोची झाली आहे. “मूळचे पवार” आणि “बाहेरून आलेल्या पवार” या स्वतःच केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवारांच्या पुरोगामीत्वाचा बुरखा पूर्ण फाटला आहे!!

    Sharad pawar called his daughter in law Sunetra pawar as an “outsider pawar”!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!