• Download App
    लज्जास्पद ! कथित शेतकरी आंदोलनात टिकरी बॉर्डरवर सामूहिक बलात्कार ; शेतकरी नेत्यांची लपवा- छपवी; पिडीतेला सिंघू सीमेवर पाठवले ; तपास सुरू Shameful: Gang rape at Tikri border in alleged farmers' agitation;  farmer leaders tried to hide ; The victim was sent to the Singhu border; Investigation underway

    लज्जास्पद ! कथित शेतकरी आंदोलनात टिकरी बॉर्डरवर सामूहिक बलात्कार ; शेतकरी नेत्यांची लपवा- छपवी; पिडीतेला सिंघू सीमेवर पाठवले ; तपास सुरू

    कथित शेतकरी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा टिकरी सीमेवर लज्जास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे .


    टिकरी बॉर्डरवर बलात्काराची ही दुसरी वेळ आहे. याआधीही शेतकरी चळवळीत सामील होण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.


    आता परत चळवळीत आलेल्या एका 25 वर्षाच्या मुलीवर टिकरी सीमेवर सामूहिक बलात्कार . बहादूरगड पोलिसांचे एसआयटी (विशेष तपास पथक) आता पुढील कारवाईसाठी पुरावे गोळा करीत आहेत.


    पिडीता पंजाबची रहिवासी आहे आणि शेतकरी नेत्यांनी तिला आता सिंघू सीमेवर पाठवले आहे.


                                           विशेष प्रतिनिधी

    बहादूरगड (झज्जर) : शेतकरी आंदोलनात महिलांची फसवणूक: शेतकरी आंदोलनात आणखी एक लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. टिकरी सीमेवर पंजाबमधील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली.हे प्रकरण समोर येताच शेतकरी नेत्यांनी मुलीला टिकरी बॉर्डरवरून सिंघू सीमेवर पाठवले आहे. Shameful: Gang rape at Tikri border in alleged farmers’ agitation;  farmer leaders tried to hide ; The victim was sent to the Singhu border; Investigation underway

    एका ट्वीटद्वारे समोर आले प्रकरण –

    जेव्हा सुप्रीम कोर्टात सराव करत असलेल्या नामांकित वकिलाने टिकरी सीमेवर आणखी एका मुलीवर बलात्कार झाल्याचे ट्विट केले तेव्हा हे सर्व प्रकरण उघड झाले.

    हे ट्विट व्हायरल झाले तेव्हा हरियाणा पोलिस अधिकार्यांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.  या माहितीस प्रथम ट्विटरवर एका वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्विट केले होते.

    वृत्तानुसार, बहादूरगड बायपासवरील आंदोलनकर्त्यांनी बांधलेल्या एका घरांमध्ये आंदोलनकर्त्यांसाठी तात्पुरते रुग्णालय सुरू आहे.

    पिडीता या रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून काम करत होती. यासंदर्भात तिने असोसिएशनच्या संचालकालाही कळविले, परंतु आरोपी स्वयंसेवकांवर कोणतीही कारवाई केली नाही, असा पीडितेचा आरोप आहे. पीडित महिलेने अद्याप स्थानिक पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

    बुधवारी रात्री उशिरा असोसिएशनच्या संचालकाने एका वृत्तपत्राला फोनवर सांगितले की, त्यांनी मुलीने केलेल्या आरोपांबद्दल संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना सांगितले होते. आता पीडित मुलीला टिकरी सीमेवरून सिंघू सीमेवर हलविण्यात आले आहे. ही मुलगी पंजाबची आहे. तिने तिची व्यथा इंस्टाग्रामवरही पोस्ट केली. दोन्ही आरोपी पंजाबमधील रहिवासी असल्याचेही सांगितले जात आहे.

    Shameful: Gang rape at Tikri border in alleged farmers’ agitation;  farmer leaders tried to hide ; The victim was sent to the Singhu border; Investigation underway

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट