- जिल्ह्याचे पालक मंत्री नवाब मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते, त्यावेळेस काहीचे येथून मुंबई पर्यंत हे कुटीर उद्योग सुरू होते.
- नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून प्रयत्न .
- आम्हाला डॅशिंग अधिकारी आंचल गोयल याच जिल्हाधिकारी हव्यात, परभणीकरांचं आंदोलन
- आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा. त्यांना रुजू करुन घ्यावे”, अशी मागणी करत परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीची आज राज्य शासनाविरोधात निदर्शने.
विशेष प्रतिनिधी
परभणी: आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी(ता.31) रुजू होऊ नयेत या करता जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आणि त्यांची नियुक्ति रद्द करून घेतली .महिला सशक्तिकरणाच्या बाता मारणार्या महाविकास आघाडी सरकारचा प्रशासनातील हस्तक्षेप कितीपत योग्य आहे असा संताप परभणीकर व्यक्त करत आहेत .Shame! Mahavikas Aghadi government’s pressure mechanism in the administration! Parbhani District Collector Aanchal Goyal’s appointment canceled – Leaders’ reputation tarnished; Parbhanikar is just aggressive
शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी करीत शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू केला.
परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. दरम्यान त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा असा कुटीर उद्योग या जिल्ह्यातील नेते मंडळींनी सुरू केला.
“आयएएस आधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारावा. त्यांना रुजू करुन घ्यावे”, अशी मागणी करत परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आज राज्य शासनाविरोधात आज निदर्शने दिली.
नेमकं प्रकरण काय?
आंचल 31 जुलैला दुपारपर्यंत पदभार घेणार असेच सर्वसामान्यांना वाटत होते. पण त्या दिवशी दुपारनंतर अचानक मुगळीकर यांनी राज्य शासनाच्या आदेशावरुन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपविला. त्यामुळे जिल्ह्यात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. जिल्ह्यातील काही नेतेमंडळींना आंचल यांचा धसका बसला असावा, त्यामुळेच त्यांनी त्यांना जिल्हाधिकारी होण्यापासून रोखलं, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे.
“आंचल गोयल यांना का रुजू करून घेतले नाही? त्या रुजू झाल्या तर कोणाचे हितसंबंध धोक्यात येणार होते? हे सर्वसामान्य जनतेला कळालेच पाहिजे.
एक महिला, आयएएस आधिकारी तिचे सात-आठ महिन्याचे बाळ घेवून पदभार घेण्यासाठी येते आणि सर्व प्रस्थापित पक्षीय नेते मंडळी साटेलोटे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन ती महिला पदभार कसा घेणार नाही, यासाठी वरिष्ठ स्तरावरुन डावपेच करतात.
ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. आंचाल गोयल यांना पदभार देण्यात यावा”, अशी मागणी आंदोलकांनी केली.