प्रतिनिधी
मुंबई – एसटी संप मिटविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी कराचा फॉर्म्यूला सांगितला आहे, त्यावर महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. तो फॉर्म्युला आम्ही गांभीर्याने घेतला आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.Seriously consider Fadnavis’s travel tax formula
अर्थात फडणवीसांनी सांगितलेला फॉर्म्युला अमलात आणणे कोरोनापूर्व काळात शक्य होते. आता खूप मोठा गॅप पडला आहे. आताही तो करता येईल. त्यासाठी संप मागे घ्यावा लागेल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
अनिल परब पुढे म्हणाले, की एसटीच्या विलिनीकरणाच्या निर्णयावर समिती निर्णय घेईल. पण चर्चा नेमकी कुणाशी करायची? एसटी कर्मचारी ना युनियनचे ऐकत ना भाजप नेत्यांचे. हे आंदोलन नेतृत्वहीन झाले आहे. कामगारांनी सांगावे कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करत आहे.
तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातो. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोनदा बोललो. पण नंतर संपर्क नाही. त्यांनी कामगारांना आझाद मैदानात आणले आहे. त्यापेक्षा त्यांनी चर्चा करावी, असेही परब म्हणाले.
Seriously consider Fadnavis’s travel tax formula
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय दूतावासावर हल्ला करणारा दहशतवादी आता झाला काबूलचा गर्व्हनर
- चीनकडून पुन्हा हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अमेरिकेपुढे नवे आव्हान
- अमरावतीची बाजारपेठ आठ दिवसांनी उघडली ; संचारबंदी शिथील केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा
- तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
- राज्य सरकार रोज नवीन काहीतरी पुड्या सोडत ; खासगीकर करणार या राज्य सरकारच्या अफवा : गोपीचंद पडळकर
- ‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद