हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही!!, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीचा आज मुख्य अजेंडाच बदलून टाकला…!! महागाईचा विषय त्यांनी हिंदुत्ववादावर घसरवला…!! हिंदू या शब्दाची नवी व्याख्या राहुल गांधींनी जयपूरच्या महारॅली केली. हिंदुत्ववादावर एकापाठोपाठ एक प्रहार करताना त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू हे दोन वेगवेगळे असल्याचा “जावईशोध” लावला. त्याच वेळी “हा देश हिंदूंचा आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही,” असे उच्चरवाने सांगत काँग्रेस आता धर्मनिरपेक्ष उरली नाही तर हिंदूंचा पक्ष झाली आहे असेच जणू सिद्ध केले…!!Saying that this country belongs to Hindus, not to pro-Hindus, Rahul Gandhi discovered in Maharali “Hindu heritage !!”
राहुल गांधींनी हिंदूंची व्याख्या करताना, “जो कोणाला घाबरत नाही, जो प्रत्येकाला जवळ करतो तो हिंदू,” अशी परीभाषा वापरली, तर हिंदुत्ववाद्यांची व्याख्या करताना, “जो घाबरतो, जो संकटाचा सामना करत नाही, संकटापुढे झुकतो, तो हिंदूत्ववादी”, असे ते म्हणाले. या देशातल्या हिंदुत्ववाद्यांची सत्ता हटवून हिंदूंची सत्ता आणायची आहे, अशी गर्जना त्यांनी केली गर्जना केली.
2019 च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी मंदिरा – मंदिरांमध्ये जाऊन स्वतःच्या हिंदू असण्याचा शोध घेत होते. ते जानवे घालणारे दत्तात्रय गोत्री हिंदू बनले. आता त्या पलिकडे जाऊन राहुल गांधींनी जाहीर सभांमध्ये, महारॅलींमध्ये हिंदू शोधायला सुरुवात केली आहे…!!
जयपूरच्या जाहीर सभेत बोलताना तुम्ही सगळे हिंदू आहात असे त्यांनी प्रेक्षकांना उद्देशून सांगितले. या वेळी सोनिया गांधी यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राहुल गांधींच्या सर्व भाषणात त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर प्रहार जरी केला असला तरी त्यांनी हिंदुत्ववाद्यांची नावे घेतलेली नाहीत.
एरवी राहुल गांधींचे भाषण हिंदुत्ववादावर प्रहार करताना सावरकर, नरेंद्र मोदी यांच्यावर घसरत असते. यावेळी या वेळेच्या भाषणातला फरक असा की त्यांनी हिंदुत्ववादावर प्रहार केला आहे आणि हिंदूंना त्यांच्यापासून वेगळे काढले आहे. “हिंदुत्ववादी म्हणजे सत्तापिपासू”, अशी नवी व्याख्या करून हिंदुत्ववाद्यांचा फक्त सत्तेशी संबंध आहे. सत्याशी नाही, असा दावाही केला आहे.
हिंदू संकटाला घाबरत नाही. संकटापुढे झुकत नाही. तो संकटाचा सामना करतो. त्यामुळे त्याच्या मनात प्रेम पैदा होते, तर हिंदुत्ववादी संकटांना घाबरल्यामुळे त्याच्या मनात द्वेष तयार होतो आणि तो कुणालाही मारत सुटतो, अशी फटकेबाजी देखील राहुल गांधी यांनी करून घेतली आहे.
या सर्व भाषणामधून राहुल गांधी हे राजकीयदृष्ट्या हिंदुत्ववाद्यांना विरोध करताना हिंदू समाजाचे लांगूलचालन करण्याच्या दिशेने वळल्याचे ल्याचे स्पष्ट झाले झाले आहे. काँग्रेसने महारॅली आयोजित केली, महागाईविरोधात!! पण राहुल गांधींनी प्रहार केला हिंदुत्ववाद्यांविरोधात!! असा हा प्रकार घडला आहे.
Saying that this country belongs to Hindus, not to pro-Hindus, Rahul Gandhi discovered in Maharali “Hindu heritage !!”
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राज्यातील सर्वात मोठे नेतृत्व : संजय राऊत
- काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीत गांधी परिवाराचा हिंदुत्ववाद्यांवर हल्लाबोल; दीर्घकाळानंतर सोनिया गांधी सार्वजनिक मंचावर!!
- काशी विश्वनाथ : लोकार्पणापूर्वी काशीनगरीत भाविकांची गर्दी, शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस फुल्ल, घरबसल्या असा पाहा हा ऐतिहासिक सोहळा
- काशी विश्वनाथ धाम : प्रशस्त रस्ते, पर्यटकांसाठी विशेष सुविधा ते रुद्राक्ष सेंटरपर्यंत, पंतप्रधान मोदींनी असे पालटले वाराणसीचे रुपडे