फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू…
Pravin Wankhade 14 Mar 2022 9:04 am 615
विनायक ढेरे
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या नवाबा तू
रे नवाबा तू
शरद सांगे ये रे दाऊदशी खेळू
रे दाऊदशी खेळू
खेळ झाला तुझा
ईडी तेल लागली काढू
रे तेल लागली काढू
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या नवाबा तू
रे नवाबा तू
उगा लागलास नादी आर्यनच्या
तू रे आर्यनच्या तू
आर्यन सुटला बाहेर अन् अडकलास तू
रे अडकलास तू
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या नवाबा तू
रे नवाबा तू
समीर म्हणे नसते झेंगट का घेतले
झेंगट का घेतले
हर्बल तंबाखूने नरडे सगळे धरले
नरडे सगळे धरले
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या नवाबा तू
रे नवाबा तू
ईडी कोठडीत का गार गार वाटे
का गार गार वाटे
पुढे सगळे शरदनेच पसरलेत काटे
रे पसरलेत काटे
फू बाई फू फुगडी फू
दमलास काय माझ्या नवाबा तू
रे नवाबा तू
(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)
Satire marathi poem on Nawab Malik ED custody