• Download App
    बाकी बाजारात कोल्हेकुई Satire marathi poem on criticism of liberals over national emblem

    बाकी बाजारात कोल्हेकुई

    दांभिकांचा दंभ उफाळून आला
    उग्रमुद्रा पाहून जळफळाट झाला

    कोण म्हणे सारनाथी सिंह शांत
    भारती प्रतीक धीर गंभीर

    पण त्यांच्या मनी वसतसे हिंसा
    म्हणून प्रतीक मानती नरसिंहा

    त्यांनी दिले सिंहां उग्ररूप साचे
    आपल्या मनातले लादले भारती

    परी चार सिंह बोलती मनात
    वर शांत रूप पण अग्नितत्त्व आत वसे

    मूळ सिंह स्वभाव उग्ररूप असे
    शांत दिसतसे वर वर

    गाजवी कर्तृत्व तोची ठरे सिंह
    बाकी बाजारात कोल्हेकुई!!

    Satire marathi poem on criticism of liberals over national emblem

    Related posts

    विधान परिषद निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादी सकट विरोधकांना नाही संधी; रोहित पवारांची निवडणूकच पुढे ढकलायची मागणी!!

    महाराष्ट्रात गाईंची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर चालणार बुलडोझर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

    महाराष्ट्र शासन आणि ॲग्रेको इंडिया कंपनीचा सामंजस्य करार; ४०० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती!!