दांभिकांचा दंभ उफाळून आला
उग्रमुद्रा पाहून जळफळाट झाला
कोण म्हणे सारनाथी सिंह शांत
भारती प्रतीक धीर गंभीर
पण त्यांच्या मनी वसतसे हिंसा
म्हणून प्रतीक मानती नरसिंहा
त्यांनी दिले सिंहां उग्ररूप साचे
आपल्या मनातले लादले भारती
परी चार सिंह बोलती मनात
वर शांत रूप पण अग्नितत्त्व आत वसे
मूळ सिंह स्वभाव उग्ररूप असे
शांत दिसतसे वर वर
गाजवी कर्तृत्व तोची ठरे सिंह
बाकी बाजारात कोल्हेकुई!!